Gold Silver Price (28th August) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (28th August) : श्रावणात सोन्याच्या दरात वाढ, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचा भाव

Today's 28st August Gold Silver Rate In Maharashtra : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (28th August):

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर पुढील ३ आठवडे सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पडझड सुरुच आहे.

मागच्या सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव घसरले होते. मागील महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकाची पातळी गाठली होती. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती. आज सोन्या-चांदीचा भाव किती असेल हे जाणून घेऊया.

1. आजचा सोन्याचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार काल 24 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)58,680 रुपये तर आज 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 58,790 रुपये मोजावे लागणार आहेत.

2. चांदीचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार काल चांदीसाठी 73,860 रुपये प्रति किलो मोजावी लागली आहे. तर आजही चांदी प्रति किलो 73,840 रुपयांनी विकली जात आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याची (Gold किंमत ५८,७९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ५८,७९० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,७९० रुपये इतका असेल.

4.   हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'प्रोपिलिन' गॅसची गळती, २२ तासांपासून वाहतूक ठप्प; नेमका धोका काय?

Psycho Oncology Cancer: कर्करोग मानसशास्त्र म्हणजे नेमके काय? पहिल्या पाच अवस्था काय असतात?

पुणे-मुंबई महामार्गावर भयंकर कोंडी; पोटात अन्नाचा कण नाही; प्रवाशांनी रस्त्यावर चूल मांडली

Mandar Shinde: प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या भावाला काम मिळेना, इंडस्ट्री सोडून ड्रायव्हिंग करण्याची वेळ

SCROLL FOR NEXT