Gold Silver Price Today: चांदीला पुन्हा चकाकी, ३३०० रुपयांची वाढ; सोन्याच्या भावातही चढउतार

Jalgaon News : सोन्याच्या भावातही चढउतार
Gold Silver Price
Gold Silver PriceSaam tv
Published On

जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून ७० ते ७२ हजार रुपयापर्यंत पोहचलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली. आठवडाभरात (Silver) चांदी तीन हजार ३०० रुपयांनी वधारली आहे. त्यामुळे चांदीचे भाव ७४ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर सोन्याच्या दरात देखील चढउतार पहावयास मिळत आहे. (Tajya Batmya)

Gold Silver Price
Kailas Patil Satement: पिक विमा कंपनी अन् सरकारचे धोरण लुडो, सापसिडी खेळासारखे; ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा हल्लाबोल

सोने-चांदीच्या बाजारपेठेत सातत्याने चढउतार पहावयास मिळत आहे. सुवर्ण बाजारात ही सुरु असलेली चढउतार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउताराने होत आहे. (Gold Price) सोन्याचे दार ६० हजाराच्या वर पोहचले होते. तर चांदी देखील ७० हजाराच्या वर गेली आहे. सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू असून ते पुन्हा ५९ हजार रुपयांच्या पुढे जात ५९ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. 

Gold Silver Price
Amravati News : ग्रामसभेत अजब ठराव..दारू बंदीचा आला प्रस्ताव; मात्र अनधिकृत दारू विक्री सुरूसाठी ठराव पास

अधिक मासातील खरेदीने वाढले भाव 

अधिक मास सुरू (Jalgaon News) झाल्यानंतर सोने- चांदीच्या भावात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र अधिक महिना संपताच त्यांचे भाव कमी झाले. चांदीचे भाव तर ७ ऑगस्टपासूनच कमी होत जाऊन ते ७० हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी त्यात एक हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ७१ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com