बिझनेस

Laptop Safety: लॅपटॉप वापरताना 'या' चूका कधीच करु नका, अन्यथा खिशाला बसेल फटका

Avoid Laptop Mistakes: महागड्या लॅपटॉपचे नुकसान टाळण्यासाठी त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. द्रवसांडणे किंवा घसरणे यासारख्या चुका गंभीर नुकसान करु शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

Dhanshri Shintre

  • लॅपटॉप पडल्यामुळे स्क्रीन व हार्डवेअरचे मोठे नुकसान होऊ शकते.

  • चहाचे, पाण्याचे किंवा इतर द्रवांचे सांडणे शॉर्ट सर्किटला कारणीभूत ठरते.

  • जास्त गरमी किंवा थंडीमुळे बॅटरी, स्क्रीन व हार्डवेअर बिघडू शकतात.

  • व्हायरस आणि मालवेअरमुळे डेटा चोरी, वेग कमी होणे व सिस्टम क्रॅश होऊ शकते.

लॅपटॉप आता फक्त ऑफिसच्या कामापर्यंत मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते विद्यार्थ्यांसाठी अभ्यासापर्यंत एक आवश्यक आणि महत्त्वाचे साधन बनले आहे. कॉम्पॅक्ट आकारामुळे डेस्कटॉपची जागा घेतलेले हे उपकरण व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. पोर्टेबल असल्याने लॅपटॉप वापरणे सोपे झाले असले तरी हेच वैशिष्ट्य त्याच्या सुरक्षिततेसाठी कधी कधी धोका निर्माण करू शकते. घाईत झालेल्या छोट्या चुका या महत्त्वाच्या उपकरणाला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.

हातातून निसटून लॅपटॉप खाली पडल्यास केवळ त्याची स्क्रीनच नव्हे तर हार्ड ड्राइव्हसारख्या अंतर्गत घटकांनाही धोका निर्माण होतो. अशा वेळी संपूर्ण सिस्टमच निकामी होण्याची शक्यता असते. याशिवाय, चहा, कॉफी किंवा पाण्यासारख्या द्रवांशी लॅपटॉपचा संपर्क आला तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. पाण्यामुळे होणारा शॉर्ट सर्किट लॅपटॉप पूर्णपणे बंद पाडू शकतो आणि डेटा गमावण्याचे प्रमाण वाढते.

तापमानाच्याही बदलांचा लॅपटॉपवर थेट परिणाम होतो. लॅपटॉप नेहमी सामान्य तापमानात चालावा यासाठी डिझाइन करण्यात आलेला असतो. पण जास्त उष्णतेत वापरल्यास त्याचे गरम होणे, बॅटरीचे जलद खराब होणे आणि कार्यक्षमता कमी होणे अपरिहार्य ठरते. थंड वातावरणात त्याचा वापर केल्यास स्क्रीन व अंतर्गत हार्डवेअरमध्ये समस्या उद्भवण्याचा धोका असतो.

केवळ हार्डवेअर नाही, तर सॉफ्टवेअर पातळीवरही लॅपटॉप अनेक समस्यांना सामोरे जातो. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे मालवेअर आणि व्हायरसचा धोका सतत डोक्यावर आहे. अशा प्रकारचे हानिकारक सॉफ्टवेअर तुमचा डेटा डिलीट करू शकते. लॅपटॉपचा वेग कमी करू शकते आणि अगदी वैयक्तिक माहिती चोरण्यापर्यंत पोहोचू शकते.

या परिणामस्वरूप सिस्टम वारंवार क्रॅश होतो किंवा पूर्णपणे काम करणे बंद करतो. त्यामुळे यूजर्सनी सजग राहून आपल्या लॅपटॉपला व्हायरस आणि मालवेअरपासून सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात लॅपटॉप म्हणजे काम, शिक्षण आणि मनोरंजन याचे केंद्रबिंदू बनले आहे. त्यामुळे त्याचे योग्यरीत्या जतन करणे आणि उपयोग करताना जागरूक राहणे हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

Tanya Mittal: '१ रुपयांचं माचिस ६५ रुपयांना विकून झाले करोडपती...'; स्वतःच्या प्रेमात आंधळी तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली

Solapur : सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना;खरीप पिके जलमय | VIDEO

SCROLL FOR NEXT