Jio Service Saam Tv
बिझनेस

Laptop अन् Phone ही मिळणार भाड्याने, वाचा काय आहे Jio ची ऑफर

Jio Financial Service : जिओ हे भारतातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी टेलिकॉम कंपनी आहे. सध्याच्या स्थितीत जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन सेवा देत असते. तसेच आता जिओने एक उत्तम सेवा सादर केली आहे.

Shraddha Thik

Jio Offer :

जिओ हे भारतातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी टेलिकॉम कंपनी आहे. सध्याच्या स्थितीत जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन सेवा देत असते. तसेच आता जिओने एक उत्तम सेवा सादर केली आहे, ज्यामध्ये लॅपटॉप (Laptop), फोन आणि डेटासाठी एअरफायबर सेवा (Service) स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात आहे.

जिओची ही एक अशी योजना आहे ज्याने आपण भाड्याने वस्तू घेऊ शकता. ज्यामध्ये कोणताही लॅपटॉप, फोन आणि Jio AirFiber सारखी इतर उपकरणे खरेदी करण्याऐवजी भाड्याने दिली जाऊ शकतात. ही जिओची आर्थिक सेवा आहे, जी विशेषतः कॉर्पोरेट्ससाठी आहे. याचा अर्थ ही सेवा सामान्य युजर्ससाठी नाही. जिओने DaaS या वित्तीय सेवेमार्फत लघू उद्योग असलेल्या लोकांना मदत करण्यात येणार आहे.

DaaS सेवा म्हणजे काय?

ही सेवा DaaS म्हणून ओळखली जाते. ज्यामध्ये डिव्हाइस ठराविक कालावधीसाठी भाड्याने दिले जाते. हे डिव्हाइस दर महिन्याला किंवा एका हप्त्यासाठी भाड्याने दिले जाऊ शकते. मोठ्या कंपन्यांना एकाच वेळी हजारो लॅपटॉप आणि मोबाइल (Mobile) फोन खरेदी करावे लागतात. ज्यामध्ये खूप पैसे खर्च करावे लागतात, तर नफा मिळविण्यासाठी अनेक वर्षे लागतात.

ज्यामुळे कंपन्यांवर खूप आर्थिक भार पडतो. अशा समस्यांपासून मुक्त होण्यासाठी, Jio ने लॅपटॉप, फोन आणि इतर उपकरणे भाड्याने देण्याची योजना आणली आहे, जी कोणत्याही स्टार्टअप किंवा छोट्या कंपनीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Jio Financial Service म्हणजे काय?

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाच्या नवीन जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने DaaS चे फायदे स्पष्ट केले आहेत, त्यानुसार DaaS वित्तीय सेवा कमी जोखमीची आहे. त्यानुसार मुकेश अंबानी, Jio Financial Services (JFS) चे उद्दिष्ट भारतातील प्रत्येक क्षेत्रातील वित्तीय सेवांच्या गरजा पूर्ण करणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT