Laptop Under 30000 : ३० हजारांच्या आत मिळेल बेस्ट लॅपटॉप; १० तास बॅटरी राहिल फुल चार्ज, लिस्ट पाहा

Best Processor Laptop : तुम्हाला स्वत:साठी बेस्ट प्रोसेसर असलेला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर हे ऑप्शन नक्की पाहा
Laptop Under 30000
Laptop Under 30000 Saam Tv

Best Laptop Under 30000 :

हल्ली स्मार्टफोन जशी काळाची गरज झाली आहे त्याप्रमाणेच लॅपटॉप देखील प्रत्येक कामात हवा असतो. ऑफिसच्या कामापासून ते शाळेच्या प्रोजेक्टपर्यंत लॅपटॉपची गरज आपल्याला पडते. जर तुम्हाला स्वत:साठी बेस्ट प्रोसेसर असलेला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर हे ऑप्शन नक्की पाहा

सध्या बाजारात अनेक मोठ्या कंपनीचे लॅपटॉप पाहायला मिळतात. परंतु, बजेट बसत नसल्यामुळे आपल्याला ते खरेदी करता येत नाही. त्यात त्याचे प्रोसेसर, बॅटरी आणि इतर गोष्टींमुळे नेमका कोणता लॅपटॉप खरेदी करावा समजत नाही. पण आम्ही तुम्हाला ३० हजारांच्या आत खरेदी करता येणारा बेस्ट बॅटरीचा पावरफुल प्रोसेसर असणाऱ्या लॅपटॉप सांगणार आहोत. पाहूया लिस्ट

Laptop Under 30000
Sign Of Heart Blockage : हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर दिसतात ही ५ लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष करु नका; अन्यथा...

विंग्स लाइफस्टाइलने सप्टेंबरमध्ये नुवोबुक मालिकेसह लॅपटॉपच्या जगात प्रवेश केला. सध्या ब्रँडने चार लॅपटॉप लाँच केले त्यात Nuvobook S1, Nuvobook S2, Nuvobook V1 आणि Nuvobook Pro. लॅपटॉपची किंमत (Price) 27,990 रुपयांपासून सुरू होते. नवीन नोटबुक फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. NuvoBook लॅपटॉप (Laptop) हे विद्यार्थी आणि ऑफिससाठी चांगला पर्याय आहे.

Wings NuvBook S1, S2, V1 आणि Pro हे सर्व 11व्या जनरल इंटेल प्रोसेसरद्वारे तयार करण्यात आले आहेत. Windows 11 Home वर देखील चालतात, ज्यात चांगली प्रगत ऑपरेटिंग सिस्टम आहे. लॅपटॉपमध्ये 4,825mAh बॅटरी आहे जी 10 तासांपर्यंत चालेल. याव्यतिरिक्त, हे उपकरण 65-वॅट चार्जरसह येतात जे 1 तासात 60 टक्के चार्ज करू शकतात.

Wings NuvBook S1, S2 आणि V1 मध्ये 15.6-इंचाचा IPS LCD फुल एचडी डिस्प्ले आहे ज्यामध्ये 300 निट्स पर्यंत ब्राइटनेस आणि 100 टक्के sRGB कलर गॅमटसाठी समर्थन आहे. हा डिस्प्ले तुम्हाला जीवंत आणि अस्सल प्रतिमा आणि व्हिडिओ पाहण्याची परवानगी देतो.

Wings NuvBook Pro मध्ये 14-इंचाचा IPS LCD FHD डिस्प्ले आहे, जो 300 निट्स ब्राइटनेस आणि 100 टक्के sRGB कलर गॅमटला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले तुम्हाला पोर्टेबल आणि पॉवरफुल लॅपटॉपमध्ये आकर्षक डिस्प्ले देतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com