Sign Of Heart Blockage : हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर दिसतात ही ५ लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष करु नका; अन्यथा...

Heart Attack Symptoms : हल्ली हृदयविकाराच्या झटक्याच्या समस्या कमी वयातील लोकांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
Sign Of Heart Blockage
Sign Of Heart BlockageSaam tv
Published On

World Heart Day 2023 :

व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीच्या आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्याच्या परिणाम आजकाल हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमध्ये दिसून आला आहे.

हल्ली हृदयविकाराच्या झटक्याच्या समस्या कमी वयातील लोकांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याची प्रकरणे डॉक्टर पाहतात. परंतु जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा आपले शरीर आपल्या काही सिग्नल देते. याकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.

Sign Of Heart Blockage
Best Cooking Oil For Heart : सावधान! जेवणात वापरले जाणारे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या

हार्ट ब्लॉकेजची लक्षणे

1. हृदयाची ठोके

जेव्हा हृदयाच्या शिरा ब्लॉक होऊ लागतात तेव्हा हृदयाचे (Heart) ठोके वाढतात. रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे रक्तवाहिना पुरेसे रक्त मिळत नाही. अशावेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

2. थकवा

जर काहीही न करता तुम्हाला थकवा जाणवत असेल तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येण्याचे लक्षण (Symptoms) असू शकते. यामुळे नसांना पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा मिळत नाही. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

3. छातीत दुखणे

जर तुम्हाला वेदना किंवा छातीत जडपणा जाणवत असेल, तर त्याकडे सामान्य वेदना दुर्लक्ष करु नका. हृदयाच्या रक्तवाहिनीवरील अडथळ्याचे लक्षण असू शकते. दुर्लक्ष केल्यास ही वेदना (Pain) खांद्यापासून बोटांपर्यंत पसरते.

4. श्वास लागणे

जरासे चालल्यावर तुमचा श्वासोच्छवासात अडथळे येत असतील किंवा बसून तुम्ही जोरजोरात श्वास घेत असाल तर रक्तवाहिन्यामध्ये अडथळ्याचे लक्षणे मानले जाते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Sign Of Heart Blockage
World Heart Day 2023 : छातीत दुखणे, सतत जळजळणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; असू शकतो गंभीर आजार

5. चक्कर येणे

कोणत्याही कारणाशिवाय चक्कर येत असेल तर हे धोक्याचे लक्षण आहे. यासाठी तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराची चाचणी करुन घ्यावी. डॉक्टरांशी संपर्क साधावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com