Lakhpati Didi Scheme Saam Tv
बिझनेस

Lakhpati Didi Scheme : खुशखबर! लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

Lakhpati Didi Scheme For Women: केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना राबवली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी आणि गरीब कुटुंबांसाठी आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी अशीच एक योजना राबवण्यात आली आहे. लखपती दीदी योजना ही खास महिलांसाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज मिळत आहे.

महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही. (Lakhpati Didi Yojana)

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामदेखील राबवला जातो. जेणेकरुन त्यांना व्यवसायासंबंधित अनेक गोष्टींची माहिती मिळेल.

या योजनेत स्किल ट्रेनिंग देऊन महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विविध क्षेत्रातील प्रोफेशनल ट्रेनर्सकडून हे ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधि महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यापासून ते त्याचे मार्केटिंग कसे करायचे इथपर्यंत सर्व गोष्टींबाबत मदत केली जाणार आहे.

महिलांना रोजगारनिर्मितीसोबतच बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. १८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिला ही भारतातील राज्यातील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे. याचसोबत कोणत्याही बचतगटात सहभागी असणे गरजेचे आहे. (Lakhpati Didi Scheme)

या योजनेत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांनी आपल्या बचत गट कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि बिझनेस प्लानबाबत माहिती द्यायची आहे. हा अर्ज मान्या झाल्यानंतर तुम्हाला संपर्क केला जाईल. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रूफ, बँक पासबुक याचसोबत अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि फोटो द्यावा लागणार आहे. (Lakhpati Didi Scheme Application Process)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT