बारावी झाल्यानंतर अनेकांना आपल्या करिअरची चिंता वाटू लागते. पुढे काय करायचे हा प्रश्न देखील अनेकांना पडतो. करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्या तरी त्या निवडताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
परंतु, जर तुम्हाला बाहेर फिरण्याची किंवा ट्रिपला जाण्याची आवड असेल तर तुम्ही १२ वी नंतर टूरिस्ट (Tourist) गाइडचा कोर्स करु शकता. यासाठी तुमची बारावी पूर्ण झालेली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर पर्यटनाला चालना देत आहेत. या क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनोळखी व्यक्तीशी सहज मिसळू शकता. पर्यटन हा तुमच्यासाठी उत्तम करिअर पर्याय असू शकतो. हा कोर्स कसा करता येतो? सॅलरी (Salary) पॅकेज किती? या क्षेत्रात किती कमाई करता येते?
1. कौशल्ये
या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रजी किंवा कोणत्याही परदेशी भाषेचे ज्ञान अशणे आवश्यक आहे. तसेच तुमचे संवाद कौशल्यासह प्रवास आणि भूगोलाचे ज्ञान असायला हवे. गाइडन्स म्हणून तुम्हाला कोणतीही गोष्ट रोमांचक पद्घतीने सांगण्याची कला शिकणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही टूर गाइडन्स करत असाल तर पर्यटक (Travel) तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न विचारु शकतात. त्यासाठी इतिहासातील प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट तुम्हाला माहित असायला हवी. तुम्ही टूर घेऊन जात असाल तर तुम्हाला त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती असायला हवी. प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा जाणून घेणेही गरजेचे आहे.
2. शैक्षणिक पात्रता
टूर गाइडन्ससाठी तुमचे १२ वी किंवा ग्रॅज्युएशन पदवी तुमच्याकडे असायला हवी. काही कंपन्या पर्यटन, टॅव्हल बॅचलर डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा नसते. परंतु, या कोर्ससाठी बहुतेक संस्था कोणत्याही मान्याताप्राप्त विद्यापीठातून पदवी केलेला असावा.
3. अभ्यासक्रम
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तीन प्रकारचे कोर्सस आहेत. शॉर्ट टर्म कोर्सचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. बॅचलर कोर्स तीन वर्षांचा आणि पीजी कोर्स दोन वर्षांचा असतो. अनेक संस्था यामध्ये सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेसही देतात. तुम्हाला बॅचलर ऑफ टुरिझम अॅडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ टुरिझम स्टडीज, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, एमए इन टुरिझम मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ट्रॅव्हल मॅनेजमेंट आणि एअरपोर्ट मॅनेजमेंट.
4. पगार किती?
या क्षेत्रात तुमचा पगार ज्ञान, मेहनत आणि तुमच्या कौशल्यावर अवलंबून असते. यासाठी तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात खासगी कंपनीतून केल्यास सुरुवातीला २० ते २५ हजार रुपये मिळतील. फ्रीलांसर म्हणून तुम्ही चांगली कमाई करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.