Ladli Lakshmi Yojana Saam Tv
बिझनेस

Ladli Lakshmi Yojana: मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत सरकार करतंय १ लाखांची मदत; लाडली लक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Ladli Lakshmi Yojana For Girls: मुलींसाठी लाडली लक्ष्मी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत केली जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून योजना राबवण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे लाडली लक्ष्मी योजना. लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार करते.लाडली लक्ष्मी योजनेबद्दल जाणून घेऊया.

मध्य प्रदेश सरकारची ही लाडली लक्ष्मी योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणापासून ते लग्नासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेत मुलींना उच्च शिक्षणासाठी जवळपास १७०००० रुपयांची मदत केली जाते.

लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी १,४३,००० रुपये दिले जातात. या योजनेत मुलगी जेव्हा सहावीत प्रवेश घेते तेव्हा तिला २००० रुपये दिले जातात. नववीत प्रवेश घेताना ४००० रुपये दिले जातात. अकरावीत प्रवेश घेताना ६००० रुपये दिले जातात. तर बारावीत प्रवेश घेताना ६००० रुपये दिले जातात.

त्यानंतर जर मुलींना दहावी किंवा बारावीनंतर उच्च शिक्षण घ्यायचे असेल, कोणत्याही व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना २५००० रुपये दिले जातात. हे पैसे दोन हप्त्यांमध्ये दिले जातात.तसेच तुम्ही मुलगी २१ वर्षाची झाली अन् तिचे लग्न झाले नसेल तर तिला १ लाख रुपयांची मदत केली जाते. (Ladli Lakshmi Yojana)

लाडली लक्ष्मी योजना ही मध्य प्रदेश राज्यात सुरु आहेत. या योजनेत तुम्ही मुलींच्या नावाने अकाउंट उघडू शकतात. तुम्ही https://ladlilaxmi.mp.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, बँक डिटेल्स आणि फोटो आवश्यक आहे. (Ladli Lakshmi Yojana Application Process)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक गोष्टी केल्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summer Waterfall In Mumbai:भर उन्हाळ्यात मुंबईत वाहतोय पांढराशुभ्र धबधबा! पर्यटकांची तुफान गर्दी, पाहा कुठे आहे हे ठिकाण?

Chanakya Niti: समोर मित्र, पण पाठीमागे शत्रू? या ५ चिन्हांवरून ओळखा लोकांचा खरा चेहरा

Shocking : धक्कादायक! हॉटेलच्या बंद खोलीत तरुणी आणि पुरुष नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच भयंकर सत्य आलं समोर

Virat Kohli: विराट कोहलीचा आयपीएलमध्ये विक्रमांचा सिलसिला सुरूच; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT