Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्यांच्या मते, एखादी व्यक्ती आधी प्रेमाने बोलत असेल आणि अचानक अंतर ठेवायला लागली तर हा मोठा संकेत असू शकतो.
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचा मार्ग दाखवणारे मोठे गुरु मानले जातात. पुढे त्यांनी दिलेला सल्ला नक्कीच वाचा.
खरे मित्र तुमच्या यशात आनंद व्यक्त करतात. पण काही लोक तुमच्या प्रगतीवर शांत राहतात किंवा तुमच्या यशाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. हे मत्सराचं लक्षण आहे.
काही लोक तुमच्या बोलण्याला वाकवून इतरांसमोर वेगळ्याच पद्धतीने मांडतात. अशा लोकांमुळे गैरसमज वाढतात.
तुम्ही नसताना तुमच्याबद्दल काय बोललं जातं हे खूप महत्वाचं असतं. जर लोक तुमची टीका, खिल्ली किंवा नकारात्मक चर्चा करत असतील.
स्वतःच्या फायद्यासाठीच नातं ठेवणारे लोक अडचणीच्या काळात साथ देत नाहीत. गरज संपली की हे लोक दूर होतात. असं चाणक्य म्हणतात.
जी व्यक्ती संकटात तुमच्या पाठीशी उभी राहते, तीच खरी मैत्री जपणारी असते. फक्त चांगल्या काळात जवळ असणाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवू नका.
जे लोक तुमची इतरांशी तुलना करतात किंवा कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या प्रगतीवर खुश होत नाहीत. त्यांच्यापासून लांब राहा.
लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतींकडे लक्ष द्या. वागणूक, वेळ आणि साथ यावरूनच व्यक्तीची खरी नीयत ओळखता येते.