Ladki Bahin Yojana  Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹२१०० मिळणार की नाही, फडणवीस सरकारमधील मंत्र्यांने स्पष्टच सांगितले

Shivendra Raje On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांचा वाढीव हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. दरम्यान, आता यावर मंत्री शिंवेंद्रराजे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Siddhi Hande

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणूकीत गेमचेंजर ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत सध्या १५०० रुपये दिले जातात.या योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवेंद्रराजे काय म्हणाले? (Shivendra Raje On Ladki Bahin Yojana)

अनेक योजना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या माध्यमातून जनतेला पोहचल्या आहेत. या योजनांचा योग्य पद्धतीने लाभ घ्यायला हवा. लाडकी बहीण योजना सुरु आहे. या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जाते. परंतु माझी सर्व बहि‍णींना विनंती आहे की, लाडकी बहीण योजना बंद होणार होणार नाही, तुम्ही काळजी करु नका. वाढीव हप्ता देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल. जे काही २१०० रुपये जाहीर केलेले ते योग्यवेळी आपल्याला देवेंद्रभाऊ देणार. आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे देवेंद्र भाऊ योग्य वेळी निर्णय घेतील. तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करतील, असं शिवेंद्रराजे यांनी सांगितलं.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जनतेसाठी योजना तयार केल्या आहेत. परंतु अनेक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ पोचल नाही. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचल नाही. लाभ कसा घ्यावा याबाबत माहितीनसते. त्यामुळे थोडा वेळ सरकारी कार्यालयात जाऊन याची माहिती घ्यावी, असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT