Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो सावधान ! तुमच्या नावावर होतोय स्कॅम, लाडकीच्या नावावर 20 लाखांचं कर्ज? VIDEO

Shocking Loan Scam: आता बातमी लाडकी बहिणींच्या फसवणुकीची...लाडकी बहिणींना कर्जबाजारी केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आलायं... लाडकी बहिण योजनेसाठी घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करुन त्यांच्याच नावावर लाखोंची कर्ज घेण्यात आलीये..लाडकींनी का काळजी घेण्याची गरज आहे पाहूया...
ladki bahin yojana
ladki bahin yojana saam tv
Published On

महिलांना आर्थिक सक्षम करणाऱ्यासाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजनाच महिलांसाठी कर्जाचा फास बनलीय...कारण योजनेसाठी जमा केलेल्या कागदपत्रांचा वापर करुन 20 लाखांचं कर्ज काढून लाडक्या बहीणींना कर्जबाजारी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय... मात्र हा घोटाळा कसा समोर आला? पाहूयात...

योजनेच्या लाभासाठी 65 महिलांकडून कागदपत्रं जमा केले

महिलांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबूकची माहिती घेतली

वित्तसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कुर्ला आणि अंधेरीतून 20 आयफोनची खरेदी

कागदपत्रांच्या आधारे आयफोन खरेदीसाठी 20 लाखांचं कर्ज घेतलं

खरेदी केलेले आयफोन इतर व्यक्तींना विकले

कर्जाची रक्कम न भरल्याने वित्तसंस्थेचे कर्मचारी महिलांच्या घरी धडकले

ladki bahin yojana
P Chidambaram : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम अचानक बेशुद्ध झाले; कार्यकर्त्यांनी उचलून अॅम्बूलन्समध्ये नेलं

या प्रकारानंतर लाडक्या बहीणींना आणि वित्तसंस्थेला गंडवणाऱ्या भामट्यांचा भांडाफोड झालाय...यातील 5 आरोपींपैकी 2 जणांच्या मुसक्या आवळल्यात...

मात्र ही योजना सुरु झाल्यापासून लाडक्या बहीणींना गंडा घालण्याची ही पहिलीच घटना नाही.. तर याधीही लाडकीच्या फसवणूकीचे प्रकार घडले आहेत...

पुण्यात लाडकीचे पैसे मिळत असल्याचं सांगत 80 हजार रुपयांचे दागिने लुटले

अकोल्यात 6 तरुणांनी लाडकीच्या नावाने अर्ज करुन फसवणूक

राज्यभरात बनावट अॅप्सच्या माध्यमातून लाडकीला गंडा घातल्याचे प्रकार

ladki bahin yojana
Nashik News : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगची एन्ट्री; भर दिवसा एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात खळबळ

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेलाच भामट्यांनी सुरुंग लावत महिलांना कर्जबाजारी केलंय.. त्यामुळे अशी भामटेगिरी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलायला हवेत... एवढंच नाही तर आपली कागदपत्रं जमा करताना त्यासंदर्भात महिलांनी योग्य खबरदारीही घ्यायला हवी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com