P Chidambaram : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम अचानक बेशुद्ध झाले; कार्यकर्त्यांनी उचलून अॅम्बूलन्समध्ये नेलं

p chidambaram News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम अचानक बेशुद्ध झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उचलून अॅम्बूलन्समध्ये नेलं.
p chidambaram News
p chidambaramSaam tv
Published On

देशभरात सर्व भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा सर्वसामान्यांसहित नेतेमंडळींनाही फटका बसत आहे. वाढत्या तापमानाचा फटका काँग्रेसचे ज्येष्ठ पी चिदंबरम यांनाही बसला आहे. उन्हामुळे पी चिदंबरम हे अचानक बेशुद्ध झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उचलून अॅम्बूलन्समध्ये नेलं.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम हे गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. चिदंबरम दौऱ्यादरम्यान साबरमती आश्रमात कडक उन्हामुळे अचानक बेशुद्ध झाले. त्यानंतर चिंदबरम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना उचलून अॅम्बूलन्समध्ये नेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

p chidambaram News
Beed Accident : अनेक वर्षांची मैत्री अपघाताने तुटली; भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या अधिवेशनादरम्यान कडक उन्हामुळे चिंदबरम बेशुद्ध झाले. त्यांना कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

p chidambaram News
Deenanath Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर; तनिषा भिसेंना स्ट्रेचरच दिलं नाही

काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते राष्ट्रीय अधिवेशनासाठी महात्मा गांधी आश्रमात पोहोचले आहेत. या अधिवेशनासाठी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहित सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. याच अधिवेशनासाठी पी चिदंबरम देखील पोहोचले. गुजरातमधील कडक उन्हामुळे पी चिदंबरम यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

p chidambaram News
Ahilyanagar News : बँडेजने बांधलं, पाणीही दिलं नाही? वसतीगृहातील ४ भिकाऱ्यांचा अचानक मृत्यू, शिर्डीत खळबळ

गुजरात ही महात्मा गांधी आणि सरदार वल्लबभाई पटेल यांची जन्मभूमी आहे. दोन्ही नेत्यांनी काँग्रेससाठी काम केलं आहे. याच काँग्रेस पक्षाचं ८ एप्रिल रोजी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात अनेक प्रस्ताव पारित केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com