Ahilyanagar News : बँडेजने बांधलं, पाणीही दिलं नाही? वसतीगृहातील ४ भिकाऱ्यांचा अचानक मृत्यू, शिर्डीत खळबळ

Ahilyanagar Latest News : भिक्षेकरूंच्या वसतीगृहातील ४ भिकाऱ्यांचा अचानक मृत्यू झालाय. ४ भिकाऱ्यांच्या मृत्यूने नगरमध्ये खळबळ उडाली आहे.
Ahilyanagar
Ahilyanagar Latest NewsSaam tv
Published On

सुशाल थोरात, साम टीव्ही

शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकारानंतर पुन्हा खळबळजनक घटना घडली आहे. शिर्डीत चार भिक्षेकरूंचा अचानक मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. भिक्षेकरूंच्या वसतीगृहात राहत असलेल्या दहापैकी चार जणांचा मृत्यू झालाय. चार भिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी भिक्षेकरू वसतीगृह प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे.

शिर्डीच्या ग्रामस्थांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस, नगरपरिषद आणि साई संस्थान प्रशासनाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दारू, मटका, जुगार, गुटखा आणि इतर मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध व्यवसायांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी आणि शिर्डीतील गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी विरोधात कठोर कारवाई करण्याच्या आदेश दिले होते.

Ahilyanagar
Tanisha Bhise death case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

शिर्डी पोलिसांनी अवैध व्यवसायावर छापा टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे. भाविकांना नशा करून पैसे मागत त्रास देणार्‍या 60 पुरुष आणि 12 महिला असे एकूण 72 भिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करत त्यांना न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाच्या परवानगीने पुरुष भिकार्‍यांना श्रीगोंदा येथील विसापूर बेगर होममध्ये रवानगी केली. मात्र त्या ठिकाणी दहा जणांना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आलं होतं. या दाखल केलेल्या दहापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Ahilyanagar
Mahad : महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्यावर रंगीबेरंगी शेवाळ; आंबेडकरी अनुयायींकडून संताप, सरकारला दिला मोठा इशारा

अशोक बोरसे, सारंगधर वाघमारे, प्रवीण घोरपडे, इसाक शेख अशी मृत्यू झालेल्या लोकांची नावे आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना बांधून ठेवण्यात आले. तसेच त्यांना पाणीही देण्यात आले नाही आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि विसापूर जेल प्रशासनांमुळे ही घटना घडली असल्याची प्रतिक्रिया मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी केली आहे.

Ahilyanagar
Sunil Shukla : राज ठाकरे हिंदूविरोधी, नास्तिक, यांनी सुपारी घेतलीय; उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांची अरेतुरेची भाषा

जोशींवर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ही मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी घेतली आहे. दरम्यान, जे व्यक्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आधीच गंभीर होती. तसेच ते व्यसनाधीन असल्याने उपचार करण्यासाठी त्यांच्या दोन बोटांना बांधण्यात आलं असल्याचा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक नागेश चव्हान यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com