Mahad : महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्यावर रंगीबेरंगी शेवाळ; आंबेडकरी अनुयायींकडून संताप, सरकारला दिला मोठा इशारा

Mahad News : महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्यावर रंगीबेरंगी शेवाळ दिसत आहे. यामुळे बेडकरी अनुयायींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
mahad
mahadSaam tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही

महाडमधील चवदार तळे हे शासनाच्या उदासीनमुळे कायम उपेक्षित असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चवदार तळ्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. लाखो रुपयांची निधी खर्च करूनही चवदार तळाच्या पाण्यावर रंगीबेंरगी शेवाळ तरंगताना दिसत आहे. यामुळे आंबेडकरी अनुयायी आणि महाडकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

महाडच्या चवदार तळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शोषित पीडितांच्या पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहामुळे तळ्याचे पाणी तमाम दलित शोषितांसाठी खुलं करण्यात आलं. आंबेडकरांच्या सत्याग्रहाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली. यामुळे संपूर्ण देशभरातून १९ आणि २० मार्च रोजी महाडच्या चवदार तळ्याजवळ सत्याग्रहाच्या स्मृतिदिनानिमित्त लाखो भीमसैनिक हजेरी लावतो. मात्र, याच चवदार तळ्याचा दुरावस्था पाहायला मिळत आहे.

महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याचे पाणी पिण्याइतके शुद्ध करण्याचा दावा केला जात असताना चवदार तळ्याच्या पाण्यावर रंगीबेरंगी शेवाळ तरंगताना दिसून येत आहे. महाड नगरपालिकेने आज पर्यंत चवदार तळ्याचे पाणी स्वच्छ रहावे यासाठी लाखों रूपयांची उधळण केली आहे. मात्र म्हणाव तितकं यश आलं नाही. कधी कारंजे, कधी फवारे तर कधी केमिकल ट्रिटमेंट देखील पाणी शुद्धीकरणासाठी केली गेली आहे. मात्र, पाणी शुद्धीकरणाचा मुद्दा तसाच प्रलंबित राहिला.

या वर्षी पुन्हा चवदार तळ्याच्या पाण्यावर लाल, हिरवे, पिवळे अशा रंगाचे शेवाळ तरंगताना दिसत आहे. चवदार तळ्याचे हे विदृपीकरण असल्याचा आरोप करीत आंबेडकरी अनुयायी आणि महाडकरांकडून संताप व्यक्त होत आहे. चवदार तळ्याचे पाणी स्वच्छ केले गेले नाहीतर 13 एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते मनोज खांबे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. चवदार तळ्याच्या पाण्यातील शेवाळावर ट्रिटमेंट सुरु आहे. येत्या काही दिवसात चवदार तळ्याचे पाणी पुर्ववत होईल, असे नगर पालिकेचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com