Aditi Tatkare Saam Tv
बिझनेस

Aditi Tatkare: आदिती तटकरेंच्या रायगडमध्ये १५ हजार महिला अपात्र? मंत्र्यांचे स्पष्टीकरण

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत रायगड जिल्ह्यातील १५ हजार महिला अपात्र ठरल्याचे सांगितले जात आहे. यावर आता आदिती तटकरेंनी स्वतः एक्स अकाउंटवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे. या योजनेत ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यातील १५ हजार महिलांचे अर्ज बाद झाल्याची बातमी समोर आली आहे. आता यावर आदिती तटकरेंनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.

आदिती तटकरेंनी त्यांच्या एक्स अकाउंटवर माहिती शेअर केली आहे. ही छाननी प्रक्रिया १० ऑक्टोबर २०२४ पूर्वीच पार पडली आहे. हे वृत्त जनतेची दिशाभूल करणारे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

आदिती तटकरेंची पोस्ट

आदिती तटकरेंनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात 'रायगड जिल्ह्यातील १५ हजारहून अधिक महिला "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून अपात्र झाल्याचे वृत्त दिशाभूल करणारे आहे.

दिनांक २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकषांच्या आधारावर महिलांनी अर्ज केले. त्यानंतर प्रत्येक जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र /अपात्र महिलांची वर्गवारी केली. त्यानुसार रायगड जिल्ह्यातून आलेल्या एकूण अर्जांपैकी सुमारे ६ लाख अर्ज पात्र ठरले, तर १५,८४९ महिला अर्ज छाननी प्रक्रियेतच अपात्र ठरल्या होत्या. ही संपूर्ण प्रक्रिया बऱ्यापैकी सुमारे दिनांक १० ऑक्टोबर २०२४ पूर्वीच पार पडली आहे.

Aditi Tatkare

पात्र ठरलेल्या सर्व महिलांना मार्च २०२५ पर्यंतचा सन्मान निधी यशस्वीरित्या वितरित करण्यात आला आहे. ज्या अर्जदार कधी योजनेसाठी पात्रच ठरल्या नाहीत, ज्यांना कधी योजनेचा लाभ देण्यात आला नाही त्या महिलांना पुन्हा नव्याने अपात्र ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हा खोटा संदर्भ देऊन करण्यात आलेले वृत्त धादांत खोटे व खोडसाळ आहे.

महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा लाभ देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. एकाही पात्र भगिनीवर अन्याय होणार नाही हा शब्द मी संपूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना देते, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: घरकुल कामासाठी ३ हजारांची लाच घेताना सावरगावचा ग्रामरोजगार सेवक (acb)च्या जाळ्यात

NESCO Drug Case : गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणाचं युरोप कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Trisha Krishnan : साऊथ सुंदरी त्रिशाची राजकारणात एन्ट्री; थलपथी विजय यांच्या जागेवर पोटनिवडणूक लढणार?

Government Employees Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगाराची ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार

Maharashtra Weather : राज्यात मेघगर्जनेसह २ दिवस पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामान विभागानं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT