Shruti Vilas Kadam
या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी ठेवले जाते. फॅटचे प्रमाण जास्त आणि प्रोटीनचे प्रमाण सामान्य किंवा पुरेसे ठेवले जाते.
कीटो डाइट मध्ये कार्ब्स कमी केल्यामुळे ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे शरिरातील साखर वाढत नाही.
कार्बोहायड्रेट्स कमी झाल्यानंतर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी साठवलेल्या फॅटचा आणि आहारातून मिळणाऱ्या फॅटचा अधिक वापर करू लागते.
कार्ब्सची उपलब्धता कमी झाल्यावर लिव्हर फॅटी अॅसिड्सपासून Ketone Bodies तयार करतो. यांचा वापर शरीरातील काही अवयव ऊर्जा मिळवण्यासाठी करू शकतात.
कीटो डाइट मुळे शरीराचा ऊर्जा मिळवण्याचा स्रोत ग्लुकोजकडून फॅटकडे अधिक वळतो. त्यामुळे फॅटचा वापर वाढू शकतो.
कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी केल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि इन्सुलिनची गरज कमी होऊ शकते. मात्र याचा परिणाम व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो.
कीटो डाइट सुरू केल्यानंतर काही लोकांना थकवा, डोकेदुखी, चक्कर, बद्धकोष्ठता किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. शरीराला नवीन ऊर्जा स्रोताशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागू शकतो.
कीटो डाइट सुरू करण्यापूर्वी तुमची आरोग्यस्थिती, औषधे आणि आहाराच्या गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः डायबेटीससारखी स्थिती असल्यास डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घ्या.
कीटो डाइटमध्ये कार्ब्स कमी केल्यामुळे शरीरात ग्लुकोजचा वापर कमी आणि फॅट/कीटोन्सचा वापर वाढण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र वजन कमी करण्यासाठी संतुलित आणि टिकाऊ आहार महत्त्वाचा आहे.