Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना एप्रिलचा हप्ता कधी येणार? या तारखेला खात्यात खटाखट पैसे येऊ शकतात

Ladki Bahin Yojana April Month Installment: लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट आता महिला बघत आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेपर्यंत येऊ शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या होत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात. नुकतेच काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीचा मूहूर्तावर कदाचित येऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा ८ मार्च महिला दिनी देण्यात आला होता. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कदाचित रामनवमीच्या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. यंदा रामनवमी ही ६ एप्रिल २०२५ रोजी आहे. त्यामुळे ६ ते १० तारखे दरम्यान कदाचित १५०० रुपये येऊ शकतात. (Ladki Bahin Yojana April Month Installment)

लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार नाहीत पैसे

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यातील ५ लाख महिला जानेवारीत तर ४ लाख महिला फेब्रुवारीत अपात्र झाल्या आहेत. अद्याप मार्च महिन्यात किती महिला अपात्र झाल्यात याचा आकडा समोर आलेला नाही.या योजनेत एकूण ५० लाख महिला अपात्र होऊ शकतात, असं सांगितलं होतं. त्यामुळे ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांना या महिन्याचे पैसे मिळणार नाहीत.

निकष बदलणार

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी माहिती दिली होती. ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाली त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. या योजनेत दुरुस्ती करणार आहोत. योजना कधीही बंद होणार नाही, असं ते म्हटले आहेत. याचसोबत योजनेत नवे निकष आणण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT