हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मार्च महिन्यामध्येच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी पाणीटंचाईचे बसणारे चटके यंदाच्या वर्षी मात्र लवकरच बसण्यास सुरुवात झाल्याने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भर उन्हात नागरिकांवर पाणी आणण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
उन्हाळा सुरु झाल्यानंतर पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवत असते. चांगला पाऊस पाडल्यानंतर देखील भर उन्हात पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागत असते. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच राज्यातील अनेक भागात पाणी समस्या जाणवत असून हिंगोली जिल्ह्यात देखील पाणी टंचाईची झळ बसण्यास सुरवात झाली आहे. तर एप्रिल व मे महिन्यात पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पाण्याचे स्रोत आटल्याने समस्या
गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी; यासाठी प्रशासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. तरी देखील पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने नागरिकांना आता पाण्याच्या शोधात शेतशिवारात भटकंती करावी लागत आहे. हिंगोली तालुक्यातील खंडाळा गावात सकाळी झोपेतून उठल्यानंतर नागरिक पाण्याचं नियोजन करण्यासाठी घराच्या बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. तर काहींना भर उन्हातच डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.
टँकर सुरु करण्याची मागणी
दरम्यान ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद अशी सर्व प्रशासकीय यंत्रणा नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत नागरिक प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे हिंगोली पंचायत समितीकडून अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून खंडाळा गावाला देखील टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा; अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.