बालाजी सुरवसे
धाराशिव : यंदाचा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा राहणार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याची चाहूल आतापासूनच लागली असून वाढत्या उन्हासोबतच पाण्याची समस्या देखील निर्माण होऊ लागली आहे. यात धाराशिव जिल्ह्यातील २२६ पैकी १६४ प्रकल्पातील पाणी झपाट्याने घटले असून सध्या ५० टक्के पेक्षा कमी प्रमाणात पाणी शिल्लक राहिला आहे. यामुळे एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील अनेक भागात आतापासून पाणी टंचाईची समस्या जाणविण्यास सुरवात झाली आहे. तर एप्रिलमध्ये हि भीषणता अधिक वाढण्याची शक्यता आहे. याची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्याचा चांगला पाऊस होऊन देखील टंचाई जाणवत आहे. तलाव, धरणात साठलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होत असते. धाराशिव जिल्ह्यात हेच चित्र आतापासून पाहण्यास मिळत आहे.
एप्रिलमध्येच टंचाईच्या झळा
आगामी काळात तीव्र उन्हामुळे होणारे बाष्पीभवन व शेतीसाठी अद्याप ही होत असलेला बेसुमार पाण्याचा उपसामुळे एप्रिलमध्येच टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे तलावातील पाणी संपल्यानंतर अन्य कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात एप्रिल किंवा एप्रिलच्या उत्तरार्धापासून टंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाणी आरक्षित करण्याची मागणी
धाराशिव जिल्ह्यातील २५० पेक्षा अधिक गावांच्या पाणीपुरवठा योजना या तलावातील पाण्यावर अवलंबून असतानाही प्रशासनाकडून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यास दिरंगाई केली जात आहे. आगामी काळात पाणी टंचाईची भीषणता अधिक होणार असल्याच्या अनुषंगाने तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी होऊ लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.