

या व्यक्तींमध्ये स्वतःच्या कामगिरीबद्दल मोकळेपणाने बोलण्याची प्रवृत्ती असल्याचं सांगितलं जातं.
मूलांक १ हा अंकशास्त्रात आत्मविश्वास, स्वतंत्र विचार आणि नेतृत्वगुणांशी जोडला जातो.
मूलांक ५ हा संवादकौशल्य, उत्साह, सामाजिक स्वभाव आणि बदलाची आवड यांच्याशी जोडला जातो.
अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकाशी विशिष्ट बलस्थाने आणि उणिवा जोडलेल्या असतात. काही लोक आपली कामगिरी इतरांसमोर मांडताना अजिबात संकोच करत नाहीत. त्यांना आपल्या क्षमता, बुद्धिमत्ता आणि यशाबद्दल चर्चा करायला आवडते. अंकशास्त्रातील मान्यतेनुसार, १ आणि ५ या मूलांकांशी संबंधित व्यक्तींमध्ये स्वतःची स्तुती करण्याची प्रवृत्ती दिसून येते. या दोन मूलांकांच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो, ते जाणून घेऊया.
कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ५ मानला जातो. अंकशास्त्रानुसार, मूलांक ५ चा स्वामी ग्रह 'बुध' आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, संवाद आणि चातुर्य यांच्याशी संबंधित आहे. मुलांक ५ असलेले लोक गप्पा मारण्यात पटाईत असतात. आपल्या सोबत घडलेल्या गोष्टी इतरांना सांगण्यात त्यांना काही कमीपणा वाटत नाही.
त्यांना आपली समजदारी आणि क्षमतेवर खूप विश्वास असतो. पण बहुतेक वेळा ते आपल्या कामाची फुशारकी मारत असतात. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते बढाई मारत असतात. कोणापुढे कोणत्याही चर्चेत आपलीच वाहवा करत असतात.
आपले गुण आणि यश इतरांना माहीत असावे, असे या व्यक्तींना वाटते. त्यामुळेच संभाषणादरम्यान त्या स्वतःहूनच आपल्या कामाचा, अनुभवांचा किंवा यशाचा विषय काढतात. कधीकधी, इतरांना ही सवय 'स्वतःचीच स्तुती स्वतः करणे' अशी वाटत असते.
ज्यांचा जन्म महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो. अंकशास्त्रानुसार, या अंकाचा स्वामी ग्रह 'सूर्य' मानला जातो. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रभाव यांच्याशी संबंधित आहे. मूलांक १ असलेल्या व्यक्तींचा स्वतःच्या निर्णयांवर आणि क्षमतांवर दृढ विश्वास असतो. त्यांना पुढाकार घ्यायला आणि इतरांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला आवडते. त्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि यशाचा खूप अभिमान वाटत असतो.
कधीकधी त्यांचा आत्मविश्वास इतका उच्च असतो की, संभाषणादरम्यान ते आपली कामगिरी आणि आपल्याच कामाचे गुणगान करण्यात ते खूप व्यस्त असतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि कामाची प्रशंसा ऐकणे त्यांना आवडते. परिणामी, लोक त्यांना अशी माणसे समजतात जी सतत स्वतःचीच स्तुती करत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.