Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता, राहणार १५०० रुपयांपासून वंचित, समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रातील लाखो महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पैशांकडे महिलांचे लक्ष आहे. या योजनेत काही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचसोबत आता तुम्ही जर इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचे आहे. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा कमी असावे. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचसोबत पेन्शनधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असेल तर कोणत्याही एका योजनेचा लाभ तिला घ्यावा लागणार आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेतल असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : "तुला माझ्यासोबत झोपावं लागेल..."; दिग्दर्शकाची प्रसिद्ध अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी

DA-DR Hike : सणासुदीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल खूशखबर?; DA वाढीसह 'ही' घोषणा लवकरच, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये स्टेशन मास्तरांवरील हल्ल्यांविरोधात रेल्वे कर्मचारी असोसियन आक्रमक

Kolhapur ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचा आक्रोश, २४ तासांपासून महामार्ग अडवला; वाहतूक खोळंबली, भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला

Gold Rate : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळं सोनं ₹१०,३०० नी स्वस्त, तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT