Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलैचे १५०० आले नाहीत? ही ७ कारणे असू शकतात

Ladki Bahin Yojana July Month Installment: लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना जुलैचे पैसे मिळालेले नाहीत. हे पैसे का मिळाले नाहीत यामागे काही कारणे असू शकतात.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता मिळाला आहे. परंतु अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. आता महिलांना १३ वा हप्ता मिळालेला आहे. दरम्यान, ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यामागे काही कारणे असू शकतात. यामागे काय कारणे असतील ते जाणून घ्या.

जुलैचा हप्ता न मिळण्याची कारणे (Reasons for Not Receiving the July Installment of Ladki Bahin Yojana)

महाराष्ट्राची रहिवासी

महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

२१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या वयोगटापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी लाभ घेतला तर त्यांचे अर्ज बाद केले जातील.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न

कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. जर तुमचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.

सरकारी नोकरदार

सरकारी नोकरी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

इतर सरकारी योजनांचा लाभ

जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

राजकीय कुटुंब

राजकीय कुटुंबातील सध्याचे किंवा माजी आमदार, खासदार असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

चारचाकी वाहन

जर कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश नाही.

ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana August Installment Update)

लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला आहे. त्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा सणासुदीच्या दिवशी मिळणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT