
Ladki Bahin Yojana News : महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेची वर्षपुर्ती सुरुय...मात्र विधानसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही वर्षभरात लाडकीच्या हप्त्यात वाढ करण्यात आली नाही... त्यापार्श्वभुमीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय...
महायुती सत्तेत आल्यानंतर तिजोरीत खडखडाट निर्माण झाला.. त्यामुळे सरकारने लाडक्या बहीणींना अपात्र ठरवण्याचा सपाटाच लावलाय... त्यात आतापर्यंत तब्बल 26 लाख लाडक्या बहीणींना अपात्र ठरवण्यात आलंय...तर आणखी 26 लाख लाडक्या बहीणींची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आलीय... मात्र कोणत्या जिल्ह्यात किती लाडक्या बहीणींची चौकशी सुरु आहे? पाहूयात...
नागपूरमध्ये 5 लाख 19 हजार 267 लाभार्थींपैकी 95 हजार 400 लाडक्या बहीणींची चौकशी
अमरावतीत 6 लाख 78 हजारपैकी 59 हजार 837 लाडक्यांची चौकशी
गोंदियामध्ये 3 लाख 12 हजार 210 पैकी 33 हजार 364 लाडक्यांची गृह चौकशी
नाशिकमध्ये 15 लाख 35 हजारपैकी दीड लाख लाभार्थ्यांची चौकशी
अहिल्यानगरमध्ये 11 लाख 26 हजार लाभार्थ्यांपैकी 1 लाख 25 हजार लाडक्यांची चौकशी
जळगावमध्ये 10 लाख 35 हजारपैकी 92 हजार लाभार्थ्यांची चौकशी
तर 26 लाख लाडक्यांची चौकशी सुरु असल्याचं समोर आल्यानंतर बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधलाय...
महायुती सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्पात लाडकीसाठीच्या निधीत 10 हजार कोटींची कपात कऱण्यात आली होती.. त्यामुळे तब्बल 50 लाख लाडकींना अपात्र ठरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती... मात्र आतापर्यंत अपात्र लाडक्या आणि दोडक्या भावांनी 4 हजार 800 कोटींवर डल्ला मारलाय... त्यामुळे सरकार उरलेल्या 26 लाख लाडक्यांना अपात्र ठरवल्यानंतर लाडकीचा हप्ता 1500 ऐवजी 2100 रुपये करणार का? याचीच उत्सुकता राज्यातील लाडक्या बहीणींना लागलीय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.