Sharad Pawar : विधानसभेला १६० जागांची गॅरेंटी, शरद पवारांचा गौप्यस्फोट; ऑफर देणारे 'ते' दोघे कोण?

Sharad Pawar Statement : निवडणूक मॅनेज करण्यासाठी 2 जण आपल्याकडे आल्याचा नवा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय... त्यावरुन राजकारण तापलंय.. मात्र निवडणूक जिंकून देण्यासाठी पवारांकडे गेलेले 2 जण कोण होते? पाहूयात या रिपोर्टमधून...
Sharad Pawar
Sharad Pawarx
Published On

Sharad Pawar News : राहुल गांधींनी बोगस मतदारांचे पुरावे दाखवून निवडणूक आयोगाची कोंडी केली असतानाच शरद पवारांनी नवा बॉम्ब फोडलाय.. विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत 2 लोकांनी भेट घेऊन 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट करत पवारांनीही निवडणूक आयोगावर दुसरा घाव घातलाय... या दोघांची राहुल गांधींसोबत भेट घालून दिल्यानंतर नेमकं काय घडलं? त्याचीही माहिती पवारांनी दिलीय...

राहुल गांधींसोबतच्या भेटीत काय घडलं?

  • दोघांनी आपलं म्हणणं राहुल गांधींना सांगितलं

  • राहुल गांधी आणि माझं मत यामध्ये पडू नये असं होतं

  • हा आपला मार्ग नसल्याने लोकांमध्ये जाण्याचा निर्णय

  • जो लोकांचा निर्णय असेल तो स्वीकारु, असं ठरवलं

या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या टायमिंगवरुन सवाल उपस्थित केलाय...

Sharad Pawar
Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या निवडणूकीत 1 कोटी बोगस मतदार आढळल्याचा गंभीर आरोप केलाय... तर संध्याकाळी 6 नंतर आश्चर्यकारकरित्या वाढलेल्या 76 लाख मतदानावर आक्षेप घेत प्रकाश आंबेडकरांनीही याचिका दाखल केलीय.. तर आता पवारांनीही ईव्हीएम सेटिंगबाबत गंभीर आरोप केलाय.. मात्र पवारांना ऑफर देणारे ते दोघे कोण? हा प्रश्न निर्माण झालाय.. त्यामुळे निवडणूक आयोग राहुल गांधींच्या आणि पवारांच्या आरोपानंतर तरी सत्य शोधण्यासाठी पावलं उचलणार का? आणि खरा डेटा जनतेसमोर मांडून दूध का दूध आणि पानी का पानी करणार का? यावर निवडणूक आयोगाची विश्वासार्हता ठरणार आहे...

Sharad Pawar
Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com