Ladki Bahin Yojana  Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना झटका, सरकार कारवाई करणार; आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

Minister Aditi Tatkare Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. लाडक्या बहिणींवर सरकारकडून कारवाई केली जाणार आहे. अपात्र असताना लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार पैशांची वसुली करणार आहे.

Priya More
  • लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांवर कारवाई होणार

  • आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट दिली

  • चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यास लाडकींना पैसे परत द्यावे लागणार

गणेश कवडे, साम टीव्ही

राज्य सरकारच्या महत्वकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. काही लाडक्या बहिणींना झटका बसणार असून सरकार त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहेत. अपात्र असताना लाभ घेतला लाडक्या बहिणींकडून सरकार वसूली करणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे अपात्र असताना लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले आहे. आदिती तटकरे यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना ही महत्वाची माहिती दिली.

आदिती तटकरे साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, 'लाडक्या बहिणींना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही काही महिलांनी ई-केवायसी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात आता तपासणी केली जाणार असून प्रत्येक विभागाकडून डेटा मागवण्यात आला आहे.'

लाडकी बहीण योजनेचा काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे या लाडक्या बहिणींवर कारवाई करत त्यांच्याकडून रक्कम वसुल केली जाणार आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या, 'पात्र लाभार्थी कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहे. पण चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. काही पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडूनही पैसे वसूल करण्यात येणार आहेत.'

अपात्र ठरलेल्या काही लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला. आदिती तटकरे यांनी सांगितले की, 'अपात्र ठरलेल्या काही महिलांचे लाभ बंद करण्यात आले होते. पण त्यानंतर काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या महिलांच्या नावावर वाहन नसतानाही आरटीओच्या डेटामध्ये नाव आले असेल त्यांनी आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर पडताळणी करून लाभ पुन्हा देण्यात येणार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ५ मोठ्या मागण्या; जुलैमध्ये होणार मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, ६० दिवसात दिला निकाल

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

Maternal death: धक्कादायक घटना! इंटरनेटवरील व्हिडिओ पाहून पत्नीची घरातच प्रसूती करण्याचा प्रयत्न, तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू

ट्रेडिशनल टू मॉडर्न, मंगळसूत्राचे लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न, वटपौर्णिमेनिमित्त खरेदी करा

SCROLL FOR NEXT