Ladki Bahin Yojana Saree Gift Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला? नवीन साडीनं सण होणार साजरा?

Ladki Bahin Yojana Saree : एकीकडे लाडकी बहीण योजनेत लाभार्थींची संख्या घटत चालली आहे. दुसरीकडे सरकार पात्र लाडक्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार आगामी होळी सणाला बहिणींना एक गिफ्ट देणार आहे. पाहूया काय आहे हे गिफ्ट या विशेष रिपोर्टमधून.

Girish Nikam

Ladki Bahin Yojana Gift : विधानसभा निवडणुकीनंतर एका बाजूला लाडक्या बहिणींच्या अर्जांची कडक पडताळणी सुरु आहे. त्यामुळे लाखो लाडक्या अपात्र ठरत आहेत. दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना आणखी खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांना सरकारनं गिफ्ट देण्याचं ठरवलंय.

होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे. अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे 50 हजार महिलांना साड्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वांत जास्त साड्या बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहेत. त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींवर आनंदाच्या रंगाची उधळण होणार आहे.

पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातील किती महिलांना लाभ मिळेल पाहुयात..

एकूण साड्यांची संख्या - 48 हजार 874

आंबेगाव - 5137

बारामती - 7975

भोर - 1909

दौंड - 7222

हवेली -251

इंदापूर - 4453

जुन्नर - 6838

खेड - 3218

दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला साडी मिळणार आहे.

जळगावातही लाडकीला साडी फ्री

जळगाव जिल्ह्यात 1 लाख 35 हजार 302 महिलांना साडी मिळणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून उपक्रम राबवला जाईल. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार होळीनिमित्त साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लाडकी योजनेचा आर्थिक भार जास्त झाल्यानं इतर योजनांना कात्री लावण्याची वेळ सरकारवर आली आहे. अशा स्थितीतच सरकारने साड्या देण्याचा नवा घाट घातलाय. मात्र या साड्यांची गुणवत्ता चांगली असेल की नाही? याबाबत आत्तापासून चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT