Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: अपात्र आहात तरीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय? सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत आता अपात्र असतानाही योजनेचे पैसे घेतले असतील तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. त्यांना यापुढचे हप्ते मिळणार नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी होणार असल्याची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेत आता ज्या अपात्र महिलांनी लाभ घेतला आहे त्यांच्यावर आता सरकार कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

लाडक्या बहि‍णींवर कारवाई होणार?

ज्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत नाही तरीही त्यांनी योजनांचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत. याचाच अर्थ असा की त्यांना पुढे कधीच या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाही. सरकार अपात्र बहि‍णींचे अर्ज बाद करुन त्यांचे पैसे बंद करणार आहे. यामुळे त्यांना आता यापुढे पैसे मिळणार नाही.

लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची तपासणी कधीपर्यंत पूर्ण होणार?

लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची तपासणी ५ टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या निकषांची पडताळणी करण्यात येत आहे. चारचाकी वाहनांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली होती. याचसोबत महिला सरकारी नोकरी करतात की नाही याचीही तपासणी झाली. दरम्यान, फक्त महिलांच्या उत्पन्नाची तपासणी अजून बाकी आहे, असं सांगण्यात आलं होतं. आयकर विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असं सांगण्यात येत आहे.

सर्व टप्प्यांमधील अर्जांची पडताळणी झाली की अपात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांचे अर्ज बाद केले जातील. आतापर्यंत अनेक अपात्र महिलांनी स्वतः हून अर्ज मागे घेतले आहेत.

एप्रिलचा हप्ता

लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीयेच्या या मूहूर्तावर हे १५०० रुपये दिले जाऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या उमरग्यात थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढले

Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

'पोलिसांनी गळा दाबला, प्रायव्हेट पार्टवर मारलं'; दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अमानुष मारहाणीची आपबिती

Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT