Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: निकष पूर्ण, केवायसी पण केली, तरी लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; नेमकं कारण काय? वाचा

Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped: लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचा लाभ बंद केला आहे. या महिला निकषांमध्ये बसत आहे. केवायसीदेखील पूर्ण केली आहे तरी त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

निकष पूर्ण, केवायसी केली तरी लाडक्या बहिणींचा हप्ता बंद

लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याचे कारण काय?

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, अनेक महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. परंतु अनेक महिलांनी केवायसी करुनही त्यांचा लाभ बंद केला आहे. त्यामुळे त्यांचे १५०० रुपये का बंद झाले असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.

या चुकांमुळे लाभ बंद (Ladki Bahin Yojana Installment Stopped due to These Reason)

लाडकी बहीण योजनेत अनेक महिला निकषात बसत आहे, त्यांनी केवायसीदेखील पूर्ण केले तरीही त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यामागचे अनेक कारणे असू शकतात. चुकीचे बँक डिटेल्स, आधार-बँक अकाउंट लिंक नसणे, अर्ज करताना चुकीची माहिती तसेच कागदपत्रांमध्ये तफावत असल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहे. एका कागदपत्रावर एक माहिती तर दुसरीकडे वेगळीच माहिती यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे.

केवायसीमध्ये चुका झाल्यावर काय करावे? (Ladki Bahin Yojana KYC Update)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अनेक महिलांकडून चुका झाल्या आहेत. यामध्ये प्रश्न नीट न कळल्याने महिलांनी चुकीची उत्तरे दिली आहे. त्यामुळे त्यांचा लाभ बंद केला आहे. तसेच कागदपत्रांमध्ये माहिती बरोबर नसल्याने लाभ बंद झाला आहे. परंतु आता महिलांना केवायसीत चुका झालेल्या महिलांना अजून एक संधी मिळणार आहे. या महिलांना ३१ मार्चपर्यंत केवायसी करायची आहे. महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन केवायसी करायची आहे. आता केवायसी करताना योग्य माहिती द्यायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT