Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! एप्रिल-मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार? खात्यात खटाखट ₹३००० जमा होणार

Ladki Bahin Yojana April & May Month Installment Come Together: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा एप्रिल- मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही एप्रिलच्या हपत्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. परंतु एप्रिल महिना संपायला ६ दिवस उरले आहेत. त्यामुळे हा हप्ता लांबण्याची शक्यता आहे. जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर एकत्र ३००० रुपये देणार की २ टप्प्यांमध्ये १५०० रुपये देणार असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे.

लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पडताळणी (Ladki Bahin Yojana Application Verification)

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे महिलांच्या पगाराची तपासणी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. ज्या महिला पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक गैरसमज होत आहेत. लाडकी बहीण योजनेत अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्यांना पैसे मिळणार नाही. तर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना १००० रुपये मिळत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून त्यांना फक्त ५०० रुपये देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT