Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या प्रत्येक अर्जांची पुन्हा छाननी होणार? या महिलांचे ₹१५०० बंद होणार

Ladki Bahin Yojana Application Verification: लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता ज्या महिलांच्या अर्जांची तपासणी होणे बाकी आहे त्यांचीच तपासणी होणार आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. अद्याप ही पडताळणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उरलेल्या सर्व महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु राहणार आहे. अजून यासाठी काही कालावधी लागणार आहे.

लाडकींच्या अर्जांची तपासणी (Ladki Bahin Yojana Application Verification)

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अर्जांची तपासणी ५ टप्प्यांमध्ये केली जात आहे. त्यात महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अद्याप झालेली नाही. लवकरच ही तपासणीदेखील पूर्ण होईल, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

या महिलांचे अर्ज होणार बाद

आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचे अर्ज बाद केले आहेत. ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाही तरीही बोगस कागदपत्रे तयार करुन लाभ घेतला त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत.९ लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. आता हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. ५० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारचा मोठा निर्णय

लाडकी बहीण योजनेत निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यांना यापुढे कधीही १५०० रुपये मिळणार नाही. काही महिलांना मागच्या दोन महिन्यांपासून पैसे दिले जात नाहीत. या महिलांचे अर्ज आधीच बाद केले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले आहे. यापुढे ज्या महिलांचे अर्जांची अजूनही तपासणी बाकी आहे त्यांची तपासणी लवकरच होईल. त्यातून निकषात न बसणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

चोरांनी रात्री दुकान फोडलं, २२ किलो चांदी लंपास केली; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Crime News: पुण्यातील फेमस रीलस्टारला अटक; ५ हजारांहून अधिक बँक खात्यांतून १० कोटींचं मनी ट्रेल, हाँगकाँग कनेक्शन उघड

बीड पुन्हा हादरलं! पेट्रोलपंपाजवळ गोळीबाराचा थरार; वाल्मीक कराड कनेक्शन आलं समोर

Mumbai : पाणी टंचाईची कटकट संपली! मुंबईच्या तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा, कोणते तलाव किती भरले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT