Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: दोन दिवसांत लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार! २१०० रुपये जाहीर होणार?

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत चित्र स्पष्ट होईल.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अपडेट समोर आले आहेत. आज महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होतील. या योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांबाबत घोषणा लवकरच होण्याती शक्यता आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च म्हणजेच सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी कदाचित २१०० रुपयांबाबत घोषणा होऊ शकते. लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही हे चित्र स्पष्ट होईल. (Ladki Bahin Yojana Update News)

लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये मिळत आहेत. २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मध्यंतरी लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये अर्थसंकल्पानंतर जमा होतील, असं वक्तव्य महायुतीच्या नेत्यांनी केले होते. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

लाडक्या बहि‍णींच्या २१०० रुपयांबाबत संभ्रम

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत आदिती तटकरेंनी मोठं विधान केलं होतं. लाडक्या बहि‍णींना यावर्षी २१०० रुपये देऊ, अशी कोणतीही घोषणा आम्ही केली नव्हती. जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात २१०० रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र शासनाचा विविध कंपन्यांसोबत नऊ सामंजस्य करार

Zubeen Garg Death: कोण होते जुबीन गर्ग? स्कुबा डायव्हिंगदरम्यान झाला मृत्यू, ‘या अली' गाण्याने पोहोचले प्रसिद्धीच्या शिखरावर

Actor Makarand Anaspure : 'गावकी आणि भावकी...; मराठा-ओबीसी आरक्षणावर मकरंद अनासपुरेंचे मोठं भाष्य

Horoscope Saturday: व्यवसायात होणार फायदा, शनिवारी पैसा येणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Thane Shocking : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; स्टोअर मॅनेजरचा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

SCROLL FOR NEXT