Pune Corporation Budget : पुणेकरांना दिलासा, कोणतीही करवाढ नाही, १२६१८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

Pune News : पुणे ⁠महापालिका २०२५ - २०२६ या आर्थिक वर्षासाठीचा १२ हजार ६१८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यात महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांसाठी ६२३ कोटी रुपयांची तरतुद
Pune Corporation Budget
Pune Corporation BudgetSaam tv
Published On

पुणे : पुणे महापालिकेचा २०२५- २६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यंदाचा हा अर्थसंकल्प पुणेकरांना दिलासा देणारा असून यात कोणतीही करवाढ नसलेला पुणे महापालिकेचा १२ हजार ६१८ कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला आहे.  अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पुणे ⁠महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २०२५ - २०२६ या आर्थिक वर्षासाठीचा १२ हजार ६१८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात प्रामुख्याने महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांसाठी ६२३ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारची करवाढ नसल्याने मोठा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे. 

Pune Corporation Budget
Tiger Attack : मासे विकून घरी परतताना घडले विपरीत; वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

पुणेकरांना मीटरप्रमाणे पाण्याचे बिल 

पुणेकरांना आगामी वर्षात मीटर प्रमाणे पाणी वापराचे बील द्यावे लागणार आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली आहे. पुणे महापालिकेने समान पाणी पुरवठ्याची योजना राबवली आहे. त्याचे काम जवळपास पुर्ण होत आले आहे. त्यामुळे आगामी वर्षात पुणेकरांना पाण्याचे बील मीटर प्रमाणे द्यावे लागणार आहे. तसेच ⁠पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी मधील घरांचे पुनर्वसन महापालिका करणार आहे. त्यासाठी देखील अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. 

३० हजार कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव

बजेटमध्ये आपल्या प्रभागातील विकासकामे अनेक माजी नगरसेवकांनी सुचवली होती. आमदारांनी देखील कामे सुचवली होती. यात आयुक्त फक्त सत्ताधारी नेत्यांचेच प्रस्ताव घेत असल्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनही केलं होतं. त्यानंतर त्यांनीही काही विकास कामे सुचवली होती. सर्व पक्षातील नेत्यांनी सुचवलेल्या विकास कामांची ही कींमत ३० हजार कोटींवर जात होती. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली. महापालिकेचे बजेट बारा हजार कोटींचा असताना सर्वपक्षीय नेत्यांनी तीस हजार कोटींची विकास कामे सुचवली होती.

Pune Corporation Budget
Shrirampur Crime : ४२ मिनिटात गाठले पाच ठिकाण; लाखोंचा ऐवज लांबविला, श्रीरामपूरात पहाटेचा थरार

महापालिकेच्या खात्यात येणार इतकी रक्कम 
पुणे महापालिकेला वर्षाकाठी वेगवेगळ्या माध्यमातून रक्कम मिळत असते. यात स्थानिक संस्था करातुन ५४५ कोटी, ⁠जीएसटीमधुन २ हजार ७०१ कोटी, ⁠मिळकत करातुन २ हजार ८४७ कोटी, ⁠बांधकाम विकास शुल्कातुन २ हजार ८९९ कोटी, ⁠पाणीपट्टी मधुन ६१८ कोटी, ⁠शासकीय अनुदान १ हजार ६३३ कोटी, ⁠कर्ज रोखे ३०० कोटी व ⁠इतर ९७५ कोटी रुपये जमा होणार आहेत.

अशी आहे अर्थसंकल्पात तरतूद 
- इमारतींच्या बांधकामासाठी ४९० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
- ⁠रस्त्यांसाठी १ हजार १२६ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
- ⁠नदी सुधारणा योजनेसाठी ३९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
- ⁠आरोग्यासाठी ५६९ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
- ⁠पाणीपुरवठ्यासाठी १ हजार ६६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे
- ⁠घनकचरा व्यवस्थापनासाठी १४२ कोटींची तरतूद केली आहे
- ⁠महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांसाठी ६२३ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे

वर्षभरात होणारी कामे 

- स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणार आहे
- ⁠मंहंमदवाडी येथे नवीन क्रीडा संकुल उभारणार आहे
- ⁠नेहरु स्टेडीयमची सुधारणा करणार
- ⁠साथ रोगांसाठी प्रयोगशाळा उभारणार
- ⁠आपत्कालीन कक्ष उभारणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com