Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Kalyan Politics: शिवसेनेने भाजपच्या नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिल्यानं महायुती नवीन तणाव निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपच्या माजी आमदाराने शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.
Maharashtra Kalyan Politics:
Political tensions rise as BJP and Shiv Sena trade charges over corporator defections ahead of civic polls.Saam tv
Published On
Summary
  • महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत पुन्हा तणाव.

  • शिवसेनेवर भाजपचा नगरसेवक पळवल्याचा आरोप.

  • भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा शिंदे गटावर हल्लाबोल.

नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत नेते पळापळव केल्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. एकनाथ शिंदेंनी त्यावरून थेट दिल्लीश्वरांकडे तक्रार केल्यानंतर भाजपनं मवाळ भूमिका घेत नेते फोडण्यावर काही काळ लगाम घातला. मात्र महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप-शिवसेना पुन्हा नेते फोडाफोडीमुळे आमने-सामने आलीय. शिवसेनेनं भाजपचा नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक झालीय.

Maharashtra Kalyan Politics:
Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

आमच्याकडेही शिवसेनेचे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरचे अनेक नगरसेवक प्रवेश घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. जर शिवसेनेकडून अशाप्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं जाणार असेल तर आम्हालाही मग आमची भूमिका बदलावी लागेल, असे म्हणत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. यामुळे नगरपालिका निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकांसाठीही पक्ष प्रवेशावरून कल्याणमध्ये भाजप-शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आलेत.

Maharashtra Kalyan Politics:
Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर, सांगोल्यात मोठी राजकीय घडामोड

महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं मु्ख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं. मात्र शिवसेना आणि भाजपातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. कल्याणमध्ये दोन्ही पक्ष समोरासमोर आलेत. माजी नगरसेवक अरुण गीध. अरुण आणि त्यांच्या भगिनी वंदना गीध यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून कल्याण पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

नगरपालिका निवडणुकांवेळी एकमेकांचे पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला होता. ज्याचे पडसाद थेट दिल्लीमध्येही उमटले होते. त्यानंतर मग दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आला. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील वरिष्ठ नगरसेवक अरुण गीध आणि त्यांच्या भगिनी वंदना गीध शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर भाजपचे माजी आमदार संतपाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com