ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

Raj–Uddhav Thackeray Unity: अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा सस्पेन्स संपलाय... संजय राऊतांनी युतीचा मुहूर्तच जाहीर केलाय... मात्र ही घोषणा कधी केली जाणार आहे... आणि ठाकरेंच्या युतीवर भाजपनं नेमकी काय प्रतिक्रिया दिलीय..
Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray and MNS chief Raj Thackeray during a key political development in Maharashtra politics.
Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray and MNS chief Raj Thackeray during a key political development in Maharashtra politics.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजला आणि राज ठाकरे - उद्धव ठाकरेंच्या युतीचा सस्पेन्सही संपलाय...कारण संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्तच सांगून टाकलाय.. एवढंच नाही तर संजय राऊत आणि अनिल परब मातोश्रीचा निरोप घेऊन राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर पोहोचले... आणि राज ठाकरेंसोबत चर्चा केली... मात्र आता युतीची घोषणा करण्याची तारीख आणि जागा वाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या होणार आहेत..मात्र ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपनं चांगलंच तोंडसुख घेतलंय...

खरंतर हिंदीसक्तीविरोधात मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. संजय राऊतांनीच 5 महापालिकांमध्ये मनसे आणि ठाकरेसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र या महापालिकांमध्ये 2017 च्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची नेमकी किती ताकद होती..

2017 चं एकूण बलाबल

मुंबई

शिवसेना- 30.41 टक्के मतं - 84 जागा

मनसे- 8.52 टक्के मतं- 7 जागा

ठाणे

शिवसेना -37 टक्के मतांसह 67 जागा

मनसे- 3 टक्के मतं - शुन्य जागा

कल्याण -डोंबिवली

शिवसेना- 38 टक्के मतं- 52

मनसे- 10 टक्के मतं- 9

नाशिक

शिवसेना--33 टक्के- 35

मनसे- 6 टक्के- 5 जागा

पुणे

शिवसेना- 14.19 टक्के मतांसह 10 जागा

मनसे- 6 टक्के मतांसह 2 जागा

ठाकरे बंधूंच्या युतीची 18 डिसेंबरला घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..मात्र या तारखेमागे राज ठाकरेंसाठी लकी असलेल्या 9 आकड्याचं गणित आहे.

ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला?

राज ठाकरेंनी 27 डिसेंबर 2005 ला शिवसेनेचं नेतेपद सोडलं- 2+7=9

18 जानेवारी 2006 ला शिवसेनेला जय महाराष्ट्र- 1+8 = 9

9 मार्च 2006 मनसेची स्थापना- 9

27 फेब्रुवारी 2010- टेलिकॉम कंपन्यांना मराठीत सर्व्हिस देण्याचे आदेश - 2+7 =9

राज ठाकरेंच्या लग्नाचा मुहुर्त- 12 वाजून 51 मिनिटं - 1+2+5+1 =9

राज ठाकरेंच्या गाडीचा नंबर - 9

खरंतर 2017 मध्ये शिवसेना एकत्र होती.. मात्र आता विभागली गेल्यामुळे ठाकरेसेनेच्या ताकदीचंही विभाजन झालंय.. विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडालेल्यानं एकत्र आलेले ठाकरे बंधू शिंदेसेना आणि भाजपला रोखण्यात यशस्वी ठरणार का ? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com