Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: १६ लाख बहिणी ७५०० रुपयांपासून वंचित; कारण फक्त आधार लिंक, आता पर्याय काय?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत २.५ कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. लाडकी बहीण योजनेत १६ लाख महिलांना पैसे मिळाले नाही. आधार लिंक नसल्याने त्यांना पैसे मिळाले नाहीत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आता ही रक्कम वाढणार असल्याचे आश्वास महायुती सरकारने केले होते. महायुती सरकार महिलांना लवकरच २१०० रुपये देणार आहे. आतापर्यंत २.६ कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्यातील २.५ कोटी महिलांनाच योजनेचा लाभ मिळाला आहे. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. ज्या महिलांना आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक केले नाही त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे १६ लाख महिलांना हप्ता मिळाला नाही. फक्त २.३ कोटी महिलांना या योजनेचे पैसे मिळाले. (Ladki Bahin Yojana News)

आतापर्यंत सरकारने १७ हजार कोटी रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. या योजनेअंतर्गत आता महिलांच्या अर्जांची पुर्नतपासणी होणार आहे. ज्या महिलांनी आधार लिंक केले नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. आधार लिंक असेल तर तुमची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. त्यामुळेच सरकारने महिलांना आधार लिंक करायला सांगितले आहे.

२१०० रुपये कधीपासून?

महायुती सरकार महिलांना लवकरच २१०० रुपये देणार आहेत. हे २१०० रुपये कधीपासून देण्यात येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झाल्यानंतर महायुती सरकार महिलांना २१०० रुपये देऊ शकते.

लाडकी बहीण योजनेबाबत अफवा

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT