Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढणार! या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता

The Women Will not Get Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता काही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही.

Siddhi Hande

महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे. यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. तुमचंही या लिस्टमध्ये नाव आहे की नाही ते जाणून घ्या.

या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही मे महिन्याचे १५०० रुपये (These Women Will Not Get May Month Installment)

लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहे. या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांकडे कोणतेही चारचाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. या महिलांना कधीच योजनेचा लाभ मिळणार नाही.

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? (When Will May Month Installment Deposite)

लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या महिन्याचाही हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मे महिन्यात एप्रिलचादेखील हप्ता जमा करण्यात आला आहे. त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT