Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : २१ ते ६५ वय असेल तरीही १५०० रुपये 'या' महिलांना मिळणार नाहीत; कारण काय?

Ladki Bahin Yojana Eligibility: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेत अनेक महिलांना अजूनही पैसे आले नाहीत. त्यामागचे कारण जाणून घ्या.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. त्यानंतर ही तारीख वाढवून १५ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली होती. दरम्यान, आता योजनेत कोणीही अर्ज करु शकणार नाही.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना पैसे मिळत आहेत. परंतु २१ ते ६५ वयोगटातीलदेखील अनेक महिलांना पैसे मिळणार नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे फक्त त्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Ladki Bahin Yojana)

या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी अर्ज केला आहे परंतु त्यातील काही महिलांना पैसे आले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या महिला अटींमध्ये बसत नाही. चला तर मग जाणून घेऊया या योजनेच्या अटी-शर्ती

१. लाडकी बहीण योजनेत फक्त महाराष्ट्रातील रहिवासी महिलांनाच लाभ मिळतो. ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे, परंतु त्यांचे लग्न महाराष्ट्रातील व्यक्तीसोबत झाले आहे त्यादेखील या योजनेसाठी पात्र ठरतात.

1. या योजनेचा लाभ २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच मिळतो. (Ladki Bahin Yojana

2.राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

3. ज्या महिलांनी या योजनेत अर्ज केला आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असावे.

4. ज्या महिलांनी या योजनेत अर्ज केला आहे त्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.

5. ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

6. सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा पेन्शन घेत असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचालाभ मिळणार आहे.

7. कुटुंबातील सदस्याकडे जर ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही चार चाकी वाहन असेव तर त्यांमा योजनेचा लाभ मिळणार नाही.

8. कुटुंबातील सदस्य आजी, माजी खासदार किंवा आमदार असेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

9. शासनाच्या इतर योजनेतून जर तुम्हाला आर्थिक लाभ मिळत असेल तर त्या महिलांना लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेमध्ये मनसेला महाविकास आघाडीची साथ

Nandurbar Political News : नंदुरबारमध्ये भाजप शिवसेना वाद विकोपाला; भाजप आमदाराचा शिंदे आमदारावर गंभीर आरोप

CRPF जवानांची बस २०० फूट दरी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

Uttarakhand Cloudburst: महाराष्ट्रातील पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले, संकटमोचक गिरीश महाजन रवाना | VIDEO

Shiva Serial Actress: 'झोळी भरली आहे आठवणींनी...', ‘शिवा’ मालिकेला निरोप देताना अभिनेत्रीला अश्रू अनावर; खास पोस्ट करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT