Maharashtra Live News Update: तासगावच्या गौरी हत्तीणीसाठी वनताराकडून 3 कोटींची आली होती ऑफर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरुवार, दिनांक ७ ऑगस्ट २०२५, ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब, भारताचा रशियासोबत करार, महाराष्ट्रात पावसाला पुन्हा सुरूवात, संसदेचे पावसाळी अधिवेशन, राज-उद्धव एकत्र येण्यावर चर्चा, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

नांदणी मठ, वनतारा आणि सरकारचे वकील याच्या मध्ये होणारी आजची बैठक उद्या होणार

उद्या दुपारी चार वाजता नरिमन पाईन्ट इथं होणार बैठक

उद्याच्या बैठकीत पुनरयाचिका दाखल करण्याचा मसुदा तयार केला जाणार.

साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर "खालिद का शिवाजी" या चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खालिद का शिवाजी हा प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटातून तथ्यहीन माहिती दिली जात असल्यामुळे हा चित्रपट सुरू होण्याआधीच बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली... या चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारी दृश्य ही कोणत्याही ऐतिहासिक तज्ञांचा सल्ला न घेता दाखवण्यात आली असल्याने या चित्रपटावर प्रदर्शित होण्याआधी तथ्यहीन वाक्यांची सुधारणा करावी अन्यथा बंदी आणावी ही मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चिपरी इथं तरुणाचा पाठलाग करून तीक्ष्णहतऱ्याने खून केल्याची घटना घडली आहे. संदेश शेळके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संदेश शेळके हा तरून बहिणीला सोडण्यासाठी कोल्हापूर- सांगली महामार्गावरील चिपरी फाट्यावर आला होता. बहिणीला सोडून घरी येत असताना दोन अनोळखी तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

उपराजधानी नागपुरात चलनात 500 रुपयांचा बनावट नोटा?

- उपराजधानी नागपुरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असलेल्या दोघाना तहसील पोलसांनी अटक केलीय.."

- जमीनरून हुसेन लोकमान शेख हुसेन आणि अजीम टानू शेख असं आरोपीचा नाव आहे..ते दोघेही पश्चिम बंगालचे आहे...

- तहसील पोलिस स्टेशन हद्दीत मध्ये गार्ड लाईन परिसरातून रात्री दोघांकडून 1 लाख 21 हजाराचा पाचशेच्या 243 बनावट नोटा जप्त केल्या आहेय...

- त्यामुळे अटकेपूर्वी आरोपींनी अनेक नोटा चलनात आणल्या असाव्या असा संशय व्यक्त केला जात आहे..

- पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर मेयो हॉस्पिटलच्या गार्ड लाईन परिसरात दोन व्यक्ती बनावट घेऊन येताच अटक करण्यात आलीय...

डान्सबार वर पालिकेची दिख्याव्याची कारवाई; डान्सबार जमीनदोस्त करावा मनसेची मागणी

मीरा-भाईंदर शहरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या केम छो डान्स बारवर भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सोमवारी कारवाई करून 16 ते 17 बारबाला ताब्यात घेत काही मुद्देमाल देखील हस्तगत केला होता.

बुधवारी मीरा भाईंदर महानगर पालिकेला परिवहन मंत्र्यांनी बारवर तोडक करण्याचे आदेश दिले होते. पालिका मोठ्या बंदीबस्तात या ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले मात्र या बारवर केवळ दिखा

सिंदखेडराजा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यात पावसाने दमदार बंटिंग केली, सोनोशी महसुल मंडळात काल सायंकाळी अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली .. तब्बल एक तास पडलेल्या या पावसामुळे शेत कामगारांमध्ये तसेच शेतकऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली.. या पावसामुळे सोनोशी येथील नदीला मोठा पूर आला होता ... दरम्यान पुलावरून पाणी वाहू लागल्याने राहेरी ते वर्दडी मार्ग दोन ते तीन तास वाहतुकीसाठी बंद पडला होता.. तर जांभोरा येथील पुलावरून सुद्धा पाणी वाहत होते, त्यामुळे रोडवर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या.. तर शेतातून घरी येणारे शेतकरी , मजूर सुद्धा या पाण्यामुळे अडकून पडले होते.. दोन्ही पुलावरचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

बीड: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीची पाहणी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावरती असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीची पाहणी केली इमारतीचे बांधकाम सुरू असून यावेळी त्यांनी पाहणी करताना पायऱ्या थोड्या बारीक आहेत काम चांगली करा लागेल तेवढा निधी देतो मात्र चुकीचे काम खपवून घेणार नाही चांगली काम करा दर्जेदार काम केले तर पैसे मिळतील असे कॉन्ट्रॅक्टरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडे बोल सुनावले यावेळी ते जिल्हाधिकारींसह संबंधित अधिकाऱ्यांना ही ते म्हणाले की मला नुसते कागदावर चालणार नाही दुसऱ्या वेळेस पाहणी ला आल्यानंतर मला सगळं व्यवस्थित दिसले पाहिजे.

पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या कॉलेज बाहेर दोन गटांमध्ये मारामारी

पुण्यातील एमआयटी कॉलेज बाहेर मारामारी

विध्यार्थीन मध्ये हाणामारी झाली या हाणामारीचा कारण समजू शकले नाही

सोशल मीडिया वरती मारामारीचा व्हिडिओ व्हायरल

कोथरूड परिसरातील कॉलेज बाहेरील हा सर्व प्रकार

कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारीमुळे भेटीचे वातावरण

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हापूस आंब्याच्या कलमांना मोहर

मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या आंब्याच्या बागेत देवगड हापूस कलमांना मोहर आला आहे. चक्क जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हा मोहर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. थंडीच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर जुलै महिन्यात आल्यामुळे कुतूहलाचा विषय बनला आहे. हा मोहर फोंडेकर यांनी औषध फवारण्या करून भर पावसाच्या हंगामातही टीकवून ठेवला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आंबा तयार होणार असून आंबा पेटीला दहा हजारापर्यंत भाव मिळणार आहे. फोंडेकर हे प्रगतशील शेतकरी असून या अगोदर सुद्धा त्यांनी गेल्या वर्षी मालवण तालुक्यातून पहीलीच पाच डझनाची हापूस आंब्याची पेटी गोव्याला पाठवली होती.

DHULE एक राखी जवानांसाठी देशाच्या सन्मानासाठी

एक राखी जवानांसाठी या उपक्रमा अंतर्गत धुळ्यातून बहिणींनी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राख्या पाठविल्या आहेत, धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला बहिणींनी आपल्या हाताने या राख्या पाठविल्या आहेत,

यावर्षी ऑपरेशन सिंदुरच्या धर्तीवर सीमेवरील जवानांसाठी देशाच्या कान्या कोपऱ्यातून थेट श्रीनगर पर्यंत प्रवास करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक राख्या संकलित करीत आहेत, एक राखी जवानांसाठी देशाच्या सन्मानासाठी या भावनेतून हा राखी सन्मान रथ शिर्डी पासून जम्मू काश्मीर श्रीनगर पर्यंत प्रवास करीत आहे, एक लाख हून अधिक राख्या आपल्या वीर जवानांसाठी आणि त्यांच्या त्यागासाठी पाठविण्याचा संकल्प आखण्यात आला असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.

Maharashtra Live News Update: सगावच्या गौरी हत्तीणीसाठी वनताराकडुन 3 कोटींची आली होती ऑफर

वनतारासाठी सांगलीच्या तासगाव गणपती संस्थानच्या गौरी हत्तीणीला दोन ते तीन कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट संस्थांच्या विश्वस्तांकडून करण्यात आला आहे.एका कथित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून गौरी हत्तीनीला अनफिट असल्याचे सर्टिफिकेट देण्या बरोबर, वनतारा संस्थेचे माध्यमातून दोन ते तीन कोटी रुपये मिळतील,अशी ऑफर देण्यात आल्याचा दावा गणपती पंचायतन संस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केला आहे, तसेच हत्तीबाबत किडनॅपिंगची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील पटवर्धन यांनी केला आहे.नांदणी मठाच्या माधुरी हत्तीच्या पार्श्वभूमीवर तासगावकरांच्या गजलक्ष्मी उर्फ गौरी हत्तीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीपासून सह्यांची मोहीम देखील राबविण्यात येणार असल्याचं राजेंद्र पटवर्धन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.तासगाव गणपती पंचायत संस्थानकडुन गेल्या 40 वर्षांपासून गौरी हत्तीनीचा संभाळ केला जातोय,या पुढच्या काळात देखील तिचा देखभाल योग्य पद्धतीने होत राहील,असा विश्वास देखील राजेंद्र पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे,मात्र वनताराबद्दल केलेल्या पटवर्धनांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

nashik-malegaon-बनावट आयडी टाकून ५ शाळांनी केली फसवणूक

नाशिकच्या मालेगाव मध्ये बनावट आयडी द्रवारे ५ शाळां पैकी बनावट आयडी व तुकडी मान्यतां पत्राद्रवारे शिक्षण विभागाकडून बॅक डेटेड वैयक्तिक मान्यता घेण्यात आली असून शासनाकडे नोंद नसलेल्या एका शाळेला तब्बल १०० टक्के अनुदान देण्यात आला आहे.या पाच शाळां मध्ये एकुण ९८ शिक्षक,४ शिपाई,५ लिपिक अशा एकुण १०७ शिक्षणकर्मींना नियमबाह्य नियुक्त्या दिल्या गेल्या असून या सर्वांनी वेत व फरकासह शासनाची सुमारे २५ कोटींचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.या पाच शाळांपैकी स्वेस,सरदार व मालेगाव बडी हायस्कुल यांच्या विरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात

सकाळपासून मुंबई शहरामध्ये पावसाला रिमझिम सुरुवात झाली आहे त्यामुळे क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर आज पावसाने मुंबई शहरात हजेरी लावलेले आहे तसेच अचानक पावसामुळे चाकरमानी आणि प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे तसेच लोकल सेवा सुद्धा सुरळीत आहेत

नाशिक - नाशकात रिक्षाचालक की वाहतूक पोलिसांचे एजंट

- वाहतूक पोलिसासाठी डील करतोय रिक्षावाला

- नाशिकमध्ये वाहतूक पोलिसासाठी डील करणाऱ्या रिक्षाचालक आणि वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

- शंभर, दोनशेमध्ये काय येतं? दारूचे भाव किती वाढले? पाचशे रुपये द्यावे लागतील

- रिक्षाचालकाचा वाहनचालकावर दबाव, पाचशे रुपये दिल्यानंतर वाहतूक पोलिसाने वाहनचालकाला सोडलं, व्हायरल व्हिडीओ

- सीट बेल्ट न लावल्याने दंड करण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून ५०० रुपयांची चिरीमिरी

- धुळ्याच्या वाहनचालकाने केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे वाहतूक पोलिसांचा वसुली कारभार चव्हाट्यावर

- शहरात बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करण्याऐवजी रिक्षाचालकांनाच बनवलं वसुली एजंट?

मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्टला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला, पुण्याच्या मुळशी तालुक्यातून चटणी भाकरी पुरवण्यात येणारं

तालुक्यातील प्रत्येक घरातून एक भाकरी गोळा करून, ती मुंबईला येणाऱ्या आंदोलकांना जेवण्याची सोय व्हावी म्हणून पोहचवण्यात येणारं

मुळशी आणि पुण्यातील कोथरूडच्या जे डी या मराठा नागरिकांच्या ग्रुपकडून हे नियोजन करण्यात येणारेय

29 तारखेच्या जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलनाला पाठींबा देऊन पुढील नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यातं आली.. त्या दरम्यान हा निर्णय घेण्यातं आला..

29 तारखेच्या आंदोलनाला मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता असल्यानं, या सर्वांची व्यवस्थित जेवणाची सोय व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यातं आलय..

पालकमंत्री अजित पवारांकडून विकासकामांचा आढावा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे दोन दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. अजित पवार यांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच दौरा सुरू केला आहे. शहरातील चंपावती क्रीडा संकुल, श्री क्षेत्र कंकालेश्वर मंदिर परिसराची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना काम व्यवस्थित करून घेण्याच्या सूचना दिल्या. सकाळपासूनच अजित पवार यांचा दौरा सुरू झाल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांची मात्र पळापळ होताना पाहायला मिळाली. आज दिवस भर अजित पवार यांचे विविध कार्यक्रम शहरात आहेत..

YAVATMAL जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सात शाखेची होणार चौकशी

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सात शाखांमध्ये झालेल्या अनियमितीचे आता चौकशी होणार असून या शाखांमध्ये आतापर्यंत झालेल्या अनियमितेची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय निबंधक गौतम वर्धन यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत या संदर्भातील एक पत्र नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे.त्यामुळे एकाच खळबळ माजली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जांब बाजार, आर्णी, महागांव,हिवरा, दिग्रस, कोल्ही आणि कलगाव या शाखेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे.

अमित देशमुखाना धक्का देत काँग्रेसला सुरुंग लावल्यानंतर माजी मंत्री बसवराज पाटील करणार शक्ती प्रदर्शन!

धाराशिवच्या मुरुम येथील विठ्ठलसाई साखर कारखान्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री बसवराज पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच करणार शक्ती प्रदर्शन

दोन दिवसांपूर्वीच 100 हून अधिक आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर होणार शक्तिप्रदर्शन

बसवराज पाटील यांच्याकडून मेळाव्यासाठी जय्यत तयारी!

पाच तासांच्या शस्त्रक्रीये नंतर 'त्या' रुग्णाची प्रकृती स्थिर; डॉक्टरांची माहिती

मंगळवारी दुपारी एक विचित्र अपघाताची घटना घडली होती. लोखंडी सळई डोक्यात घुसल्याने जखमी झालेल्या सोनू अली याच्यावर पाच तासांच्या शस्त्रक्रिये करण्यात आली जखमी रुग्णाची प्रकृती स्थिर असून सोनू अली यावर उपचार करणाऱ्या डॉ.श्रुती शेळके यांनी दिली आहे.

मेट्रो प्रकल्प पुलावरून पडलेली लोखंडी सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याची घटना मंगळवारी नारपोली परिसरात घडली होती.या अपघातातील जखमी सोनू अली याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या अपघात प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून जखमी सोनू अली यास योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत बंद

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत बंद , काम अपूर्ण राहिल्याने सुरळीत दर्शन सुरू होऊ शकत नाही मंदिर संस्थानची माहिती

देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील संवर्धनाच्या कामासाठी सुरुवातीला एक ते दहा ऑगस्ट दरम्यान दर्शन बंद

आता दर्शन बंद कालावधी आणखी दहा दिवसांनी वाढवला,आता 20 ऑगस्ट पर्यंत गाभाऱ्यातील दर्शन बंद, भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार

देवीचे मुखदर्शन, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा नियमती सुरू राहणार

20 ऑगस्टपर्यंत गाभाऱ्यातील दर्शन व्यवस्था बंद राहणार, कालावधी वाढवल्याची मंदिर संस्थानची माहिती

बेशिस्त वाहतूक करणाऱ्या 104 ऑटोंवर कारवाई...

अकोला पोलिसांची शहर वाहतूक शाखा 'ॲक्शन मोड'मध्ये पाहायला मिळालीय. शहरात नियमांची पायमल्ली करत बेशिस्त वाहतूक करणाऱ्या 104 ऑटोंवर पोलिसांनी कारवाई केलीये. शहरातील बस स्थानक चौक, रेल्वे स्टेशन चौक, गांधी चौक आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. कारवाई करण्यात आलेले सर्व 104 ऑटो जिल्हाधिकारी कार्यालयासमोरली शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आलीय. या सर्व ऑटोंवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्या चालकांचं समुपदेशन करण्यात आलंय. वाहतूक नियमांचे पालन करण्याचं आवाहन शहर वाहतूक शाखेने ऑटो चालकांना केलंय.

अकोल्यात एका ऑटोतून गांजाची तस्करी...

अकोला शहरातल्या रामदासपेठ पोलिसांनी 15 किलो गांजा जप्त केलाय. रेल्वे स्टेशन चौकात नाकाबंदी दरम्यान हा गांजा जप्त करण्यात आलाय. एका ऑटोतून या गांजाची तस्करी करण्यात येत होतीय. याप्रकरणी पोलिसांनी सोहेल अहमद अब्दुल शकील आणि शेख हमीद शेख रशीद या दोन आरोपींना अटक केलीये. पोलीस कारवाईत 15 किलो गांजा, ऑटो आणि दोन मोबाईलसह दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय.

अकोल्यात गावठी हातभट्टी दारू अड्डे पोलिसांकडून उध्वस्त...

अकोल्यातल्या अकोट फैल आणि चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात सुरु असलेल्या हातभट्टी दारू अड्डा पोलिसांनी उध्वस्त केलाय.. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या दोन्ही दारू हातभट्टी अड्ड्यावर कारवाई केली.. यावेळी शेताशिवारातल्या नदीकाठी अनधिकृतपणे गावठी दारुची हातभट्टी अकोला पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तसेच दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले. यादरम्यान दारू हातभट्टी चालकासह इतर काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, अनकेदा दारू हातभट्टी अड्ड्यावर कारवाई केली जाते. दारु साठा आणि लागणारे साहित्य पोलीस जप्त करतात. मात्र काही दिवसांनी त्या दारू हातभट्या पुन्हा सुरू होतात. त्यानंतर अधून मधून पुन्हा कारवाई केली जाते. दारु आणि दारू गाळप करणाऱ्यावर लोकांवर कारवाई करण्याची पहिली जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहेय. मात्र, ती होताना दिसत नाहीए.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com