Shiva Serial Actress: 'झोळी भरली आहे आठवणींनी...', ‘शिवा’ मालिकेला निरोप देताना अभिनेत्रीला अश्रू अनावर; खास पोस्ट करत म्हणाली...

shiva serial Off Air: झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘शिवा’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दीड वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपणार आहे.
Shiva Serial Actress
Shiva Serial ActressSaam Tv
Published On

shiva serial Off Air: झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘शिवा’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दीड वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपणार आहे. मालिकेच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री पूर्वा कौशिकने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने या प्रवासाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आहे.

पूर्वा कौशिक हिने इन्स्टाग्रामवर सेटवरील काही फोटो शेअर करत लिहिले की, “एक पर्व संपलं... ८ ऑगस्टला मालिका ऑफ एअर होणार... मालिकेच्या शेवटच्या आठवड्यात आता चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. ‘शिवा’नंतर या स्लॉटमध्ये नवीन मालिका दाखल होणार आहे. मात्र ‘शिवा’ने मागे सोडलेले आठवणींचे क्षण प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील.... झोळी भरली आहे आठवणींनी... डोळे पाणावले... मनात फक्त कृतज्ञता.” या पोस्टमधून तिने ‘शिवा’ या भूमिकेविषयी आणि संपूर्ण प्रवासाविषयी आपले प्रेम आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

Shiva Serial Actress
The Trial 2: मी किती वेळा कमबॅक करू? 'द ट्रायल 2' ची घोषणा करताना का चिडली काजोल?

या पोस्टवर मालिकेतील सहकलाकार आणि चाहते यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्रुतकीर्ती सावंत, अपूर्वा नेमळेकर यांच्यासह अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. ‘शिवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ठरली होती. पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

Shiva Serial Actress
Box Office Collection: 'महावतार नरसिंह' आणि 'सैयारा'मध्ये कांटे की टक्कर; जाणून घ्या 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २'ची कमाई

शिवा मालिकेच्या शेवटच्या आठवड्यात अनेक ट्विस्ट पहायला मिळाले होते. प्रेक्षक देखील या मालिकेबद्दल विविध कमेंट करत होते. ‘शिवा’नंतर या स्लॉटमध्ये नवीन मालिका दाखल होणार आहे. मात्र ‘शिवा’ने मागे सोडलेले आठवणींचे क्षण प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com