Kajol Announces The Trial Season 2: काजोल हे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक नामवंत अभिनेत्री असून नुकतंच तिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काजोलने मधला बराच काळ चित्रपट केला नसला तरी आता ती मा सारखे उत्तम चित्रपटांमध्ये झळकत आहे. म्हणूनच अभिनेत्रीला आता कमबॅक या शब्दाचा कंटाळा आली आहे आणि तिने तिच्या आगामी घोषणेत हे देखील नमूद केले आहे. काजोल सतत काम करत आहे आणि तिला स्वतःसाठी कमबॅक हा शब्द वारंवार वापरायला आवडत नाही.
काजोलने सोशल मीडियावर घोषणेचा व्हिडिओ शेअर करताना तीला एक नोट वाचायला लावतात ती नोट वाचताना काजोल म्हणते, 'नमस्कार, मी काजोल मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी कमबॅक करत आहे. एवढ वाचून ती चिडते आणि म्हणते कमबॅक? हे अति झालं. मी किती वेळा कमबॅक करु? मी कुठे गेले होते? सतत कामचं तर करत आहे आणि आता तुम्ही लोक म्हणाल की काजोल आमच्यावर फक्त रागवते एवढ्यात तिला सांगितलं जात नोटची मागची बाजू वाच त्यात ती वाचते, मी काजोल मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी 'द ट्रायलचा दुसराच्या सीझन मधून पुन्हा कमबॅक करत आहे.
काजोलचा 'द ट्रायल २' कधी येणार?
काजोलबद्दल बोलायचे झाले तर, २०१० ते २०१९ पर्यंत तिने एवढे चित्रपट नाही केले जेवढे तिने २०२० पासून आतापर्यंत केले. या काळात तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले आहे आणि तिचे काही लघुपटही खूप लोकप्रिय झाले आहेत. तिच्या मागील काही चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात सलाम वेंकी, त्रिभंगा, लस्ट स्टोरीज २, माँ, सरझमीन आणि तान्हाजी सारख्या चित्रपट समाविष्ट आहेत. २०२३ मध्ये ओटीटीवरील 'द ट्रायल' या वेब सिरिजचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.
आता चाहत्यांना त्याचा दुसरा सीझन किती आवडेल हे पाहायचे आहे. दुसऱ्या सीझनचे शीर्षक 'द ट्रायल - प्यार, कानुन, धोखा' असे ठेवण्यात आले आहे. ही सीझन १९ सप्टेंबर २०२५ पासून जिओ प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल. तिच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ती 'माँ' या हॉरर चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.