Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा बंद; ₹१५०० मिळणार नाही, सरकारने सांगितलं कारण

Ladki Bahin Yojana These Women Will Not Get Benefit: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्यापासून आता अपात्र महिलांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींचे टेन्श वाढवणारी बातमी

या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार

मे महिन्यापासून मिळणार नाही लाभ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर केवायसी केली नाही तर महिलांचा लाभ बंद होणार आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. यामध्येही काही निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो. दरम्यान, आता या योजनेत काही महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. मे महिन्यापासून निकषात न बसणाऱ्या अपात्र महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे, असं महिला व बालविकास विभाग कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

लाखो महिला अपात्र ठरल्या

लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा सोलापूरातील १८ वर्षांवरील मतदारांची संख्या १८ लाख ७७ हजार होती. या योजनेच्या ११ लाख २१ हजार महिला लाभार्थी होत्या. परंतु अनेक महिलांनी वयोमर्यादेत नसतानाही लाभ घेतल्याचा संशय होता. याचसोबत अनेक महिलांनी उत्पन्नात पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, विधानसभा निवडणुका होईपर्यंत महिलांना सरसकट लाभ देण्यात आला. यानंतर महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. यामध्ये लाखो महिलांचा लाभ बंद झाला. यामध्ये अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची कारणे (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ मध्ये नसणे, महिलांकडे किंवा कुटुंबाकडे चारचाकी वाहन असणे, इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ई-केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद होणार आहे. याचसोबत महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. अशा महिलांचा लाभ बंद होणार आहे. मे महिन्यापासून या सर्व महिलांचे लाभ बंद होणार आहेत. त्यांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Insomnia Relief: रात्री झोप येईना? 'या' ५ चुका टाळा मग येईल गाढ झोप

IPL 2006: राजा की रंक! पंजाब किंग्ससमोर 'करो की मरो'ची स्थिती; जाणून घ्या प्लेऑफचं संपूर्ण समीकरण

Political News: बड्या राजकीय नेत्याच्या मृत्यूनं राजकीय वर्तुळात खळबळ; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

School Reopen : १५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख का बदलली जाणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Shivali Parab Photos: काय दिसते राव, एकदम कडक! शिवालीचे फोटो पाहून फिदा व्हाल

SCROLL FOR NEXT