Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

Maharashtra Scheme: उल्हासनगर महानगरपालिकेची ‘लाडकी विद्यार्थिनी योजना’ अंतर्गत सातवी ते बारावीतील मुलींना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार असून शिक्षणाला मोठा आधार मिळणार आहे.
Maharashtra Launches Ladki Vidyarthini Scheme
ladki vidyarthini yojanagoogle
Published On

जय दुधाणे - उल्हासनगर

महाराष्ट्रात महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही सध्या महिलांसाठी मोठी आणि चर्चेत असणारी योजना आहे. लाखो महिलांना या योजनेमुळे फायदा झाला आहे. त्यातच आता मुलींच्या शिक्षणासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं गेलं आहे.

उल्हासनगरमधील विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेकडून एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. याने मुलींच्या शिक्षणातले अडथळे नक्कीच कमी होणार आहेत.

Maharashtra Launches Ladki Vidyarthini Scheme
PPF Calculation: PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग हे नवं कॅल्क्युलेशन घ्या समजून, नाहीतर गमावाल लाखो रुपये

उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी 'लाडकी विद्यार्थिनी योजना' जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शहरातल्या सातवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती स्वर्गीय आमदार ज्योती कालानी यांच्या नावाने दिली जाणार आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विद्यार्थिनींना अशा प्रकारे नियमित आर्थिक मदत देणारी ही पहिलीच योजना असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणात सातत्य राहण्यास आणि शाळा सोडण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी ही योजना नक्कीच फायद्याची ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापौरांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून शिक्षण क्षेत्रात हा एक सकारात्मक आणि महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे.

Maharashtra Launches Ladki Vidyarthini Scheme
राजकीय वाद पुन्हा उफाळला; अकोल्यात काँग्रेस-एमआयएम नगरसेवकांमध्ये राडा, चाकू हल्ला अन् हाणामारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com