Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: eKYC नाही, सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकीच्या पुढच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana eKYC Mandatory: लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, केवायसी केले नाही तर महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र, केवायसी न केलल्या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. लाडकी बहीण योजनेत जर केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाहीये. त्यामुळे अनेक लाडक्या बहि‍णींनी केवायसी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.या दोन महिन्यात महिलांना केवायसी करायची आहे. दरम्यान, ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळणार नसल्याची चर्चा सुरु आहे. परंतु योजनेची केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

केवायसीशिवाय सप्टेंबरचा हप्ता येणार नाही? (Ladki Bahin Yojana September Month Installment Update)

दरम्यान, ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. हे जरी खरे असले तरी केवायसी न केलेल्या महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता महिलांना मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच सप्टेंबरचा हप्ता द्यायचा का की नाही द्यायचा याबाबत लवकरच माहिती समोर येईल. सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच याबाबत माहिती समोर येईल.

लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी केवायसी करणे अनिवार्य असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. परंतु त्यानंतरचे हप्ते थांबवले जाऊ शकतात. केवायसी न केल्यास नोव्हेंबरनंतरचा हप्ता हप्ता थांबवला जाणार आहे. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबरबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

केवायसी करताना अडचणी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा आधार कार्ड अपलोड होत नाहीये, ओटीपी येत नाहीये तर साईटवर लोड येतोय. यामुळे ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

८०च्या दशकात रॉयल एनफील्ड बुलेटची किंमत किती होती? जुनं बिल सोशल मीडियात व्हायरल

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Natural Hair Care: महागड्या पार्लरला विसराल; पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय सापडला, वाचा

Shocking: 'दारू पाजली, प्रायव्हेट व्हिडीओ बनवले नंतर...' अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला अटक

Maharashtra Flood Relief Package: घरं, झोपड्या, दुकानदारांना भरपाई मिळणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पण कशी? VIDEO

SCROLL FOR NEXT