Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

Ladki Bahin Yojana Ineligibility Status: लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता अपात्र महिलांकडून वसूली केली जात आहे. मात्र, ज्या १२ हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे त्यांना साध पत्रदेखील पाठवलेलं नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती उघड

बोगस महिला लाभार्थ्यांकडून पैसे वसूली सुरु

१२ हजार पुरुषांना साध पत्रदेखील पाठवलं नाही

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहेत. महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे हजारो पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, या महिलांकडून आता वसूली केली जात आहे. सरकारने याबाबत पाऊल उचलले आहे.

लाडकी बहीण योजनेतून ज्या पुरुषांनी लाभ घेतला आहे त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे, असं सांगण्यात आले होते. तसेच उत्पन्न जास्त असलेल्या किंवा शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांकडूनही पैसे परत घेतले जात आहेत.

आता सरकारने बोगस ठरलेल्या महिलांकडून अर्ध्यापेक्षा जास्त वसूली केली आहे. मात्र, अजूनही अनेक पुरुषांकडून वसूली केलेली नाही. १२ हजार ७५७ पुरुषांना साध पत्रदेखील पाठवलेले नाही. या पुरुषांनी सरकारचे जवळपास २३ कोटी रुपये घेतले आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली केली जात आहे, मात्र बोगस पुरुषांना कोणतेही पत्र पाठवलेले नाही. त्यामुळे सरकार पुरुषांना अभय देतंय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लाडकी बहीण योजनेतून ज्या पुरुष लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अजूनही त्यांच्याकडून कोणतेही पैसे वसूल केले नाही. दरम्यान, महिलांकडून पैसे वसूल केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात या पुरुषांकडून २३ कोटींची वसूली करणार का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपला शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर, मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याच्या मागणीवरून शिंदे गट आक्रमक

युतीची चर्चा फिस्कटली! भाजपचा एकला चलो चा नारा, राजकारणात खळबळ

Chirag Paswan : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट; ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

Parenting Tips: लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय? 'या' 5 उपायांनी दूर होईल स्क्रीन पाहण्याची सवय

SCROLL FOR NEXT