Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची टेन्शन वाढवणारी बातमी! ₹१५०० बंद होण्याची शक्यता; कोणाला बसणार फटका?

Ladki Bahin Yojana Reverification: लाडकी बहीण योजनेत आता संशयित लाभार्थी महिलांची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये अपात्र महिलांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

अपात्र महिलांचा लाभ कायमचा बंद होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. डिसेंबर महिन्यापासून लाखो महिलांना पैसे मिळालेले नाहीत. यामागचे कारण म्हणजे अपात्रता, केवायसी न करणे आणि केवायसीमधील चुका. या गोष्टींमुळे महिलांचा लाभ बंद झाला आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये अनेक महिलांनी अपात्र असतानाही लाभ घेचला आहे. या महिलांचे लाभ आता बंद केले जाणार आहे. महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे.

या महिलांचा लाभ होणार बंद (Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped)

ई केवायसीमध्ये अनेक महिलांनी पात्र नसतानाही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. अनेक महिला या २१ वर्षांखालील आहेत तर अनेक महिला ६५ वर्षांवरील आहे. या महिलांचा लाभ कायमचा बंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. या महिलांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहे.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांनाही पैसे मिळणार आहे. कुटुंबातील फक्त दोन लाभार्थी लाभ घेऊ शकतात. जर या अटीत बसत नसाल तर महिलांना १५०० रुपये मिळणार नाही. ही सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पात्र महिलांना पैसे मिळणार आहे. याचसोबत केवायसीमध्ये चुका झालेल्या महिलांचीही पडताळणी केली जाणार आहे.

ज्या लाभार्थी महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. याचसोबत केवायसीमध्ये चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे. तोपर्यंत जर तुम्ही चुका सुधारल्या नाही तर तुमचाही लाभ बंद होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT