Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! ₹६००० एकत्र पाहिजे असेल तर 'हे' काम आजच करा

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर केवायसी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. आता यासाठी शेवटची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

ईकेवायसीमधील दुरुस्ती सुधारण्यासाठी शेवटची संधी

ईकेवायसी केल्यानंतर मिळणार ६००० रुपये

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी करणे बंधनकारक केले आहे. आता फक्त ईकेवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत अनेक महिलांनी केलेल्या ईकेवायसीमध्ये चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता पुन्हा एकदा दुरुस्ती करावी लागणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ३५ लाख लाडक्या बहि‍णींचा हप्ता रखडणार, ₹१५०० न मिळण्याचे कारण आले समोर

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीमध्ये त्रुटी आढळलेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांद्वारे पडताळणी सुरु आहे. महिलांची केवायसीमधील दुरुस्ती ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे त्या महिलांच्या केवायसीमध्ये चुका झाल्या आहेत त्यांनी ते दुरुस्त करायच्या आहेत.

फक्त या महिलांनाच मिळणार ६००० रुपये (Ladki Bahin Yojana These Women Will Get 6000 Rupees Installment)

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी केवायसी केली नाही किंवा केवायसीमध्ये त्रुटी आहेत त्यांचा लाभ बंद झाला आहे. या महिलांना डिसेंबरपासून पैसे मिळत नाहीयेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना ४ महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. या महिलांना ६००० रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हीही आजच ऑनलाइन पद्धतीने केवायसीमधील त्रुटी दुरुस्त करा जेणेकरुन तुम्हालाही योजनेचा लाभ घेता येईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची ई-केवायसी पुन्हा सुरू; २ प्रश्नांची उत्तरे अचूक द्या, मिळवा झटपट ४५०० रुपये

केवायसी करण्याची मुदत (Ladki Bahin Yojana eKYC Deadline)

ईकेवायसीमधील चुका दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही तोपर्यंत केवायसी केली नाही तर तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर केवायसी करायची आहे. याचसोबत केवायसी करताना सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे द्या. जेणेकरुन भविष्यात अडचण येणार नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: फक्त याच महिलांना मिळणार जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता; खात्यात जमा होणार ₹३०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com