Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: पुण्यात सर्वाधिक लाडक्या बहिणी, ८३ टक्के विवाहित महिला घेतायत लाभ, आकडेवारी समोर

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आकडेवारी समोर आली आहे. या योजनेत पुण्यातील सर्वाधिक महिला लाभ घेत आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर

सर्वाधिक महिला पुणे जिल्ह्यातील रहिवासी

सर्वात कमी महिला लाभार्थी गडचिरोतलीतून

महाराष्ट्र सरकारने २ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला २.५ कोटी लाभार्थी होते. यानंतर पडताळणीमध्ये अनेक लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. सध्या या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १.५३ कोटी लाभार्थी आहेत. जवळपास ९० लाख महिला अपात्र झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विविध वयोगटातील, विवाहित, अविवाहीत महिलांनी लाभ घेतला आहे.

या जिल्ह्यातील सर्वाधिक महिला लाभार्थी (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत राज्यातील सर्व जिल्ह्यातील महिलांनी लाभ घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. कोकण विभागात सिंधुदुर्गात सर्वाधिक कमी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. दुसरीकडे विदर्भात गडचिरोलीत सर्वाधिक कमी लाडक्या बहिणी असल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी जेव्हा योजना सुरु झाली तेव्हाची आहे. यानंतर अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेत.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांपैकी ८३ टक्के महिला या विवाहित आहेत. टक्के अविवाहीत महिला ११.८ होत्या.तर विधवा महिलांच संख्या ४.७ टक्के आहे. घटस्फोटीत महिलांची संख्या १ टक्क्यापेक्षादेखील कमी आहे.

या महिलांनाच मिळतो लाभ

लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. या महिला निकषात बसत नसल्याने त्यांचा अर्ज बाद केला आहे. यामध्ये फक्त २१ ते ६५ वयोगटातील महिलांना लाभ मिळतो. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचाही लाभ बंद केला आहे. ज्या महिलांनी केवायसी केले नाही अशाही महिलांचा लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. एकूण ९० लाख महिलांचा अर्ज बाद केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना यापुढे १५०० रुपये मिळणार नाहीयेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT