Ladki Bahin Yojana saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार की सुरू राहणार? बावनकुळेंनी थेट सांगितलं

Maharashtra Government : लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण येत असल्याचं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं होतं. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार का? असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला होता. आता यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट सरकार ही योजना आणखी मजबूत करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही! (Ladki Bahin Yojana latest news today in Maharashtra)

नागपूरजवळच्या कोराडी इथल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी योजनेबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यावर आर्थिक ताण येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण हा ताण कमी करण्याची क्षमता राज्य सरकारमध्ये आहे, असं ते म्हणाले.

यंदा दुष्काळी परिस्थिती असली तरी सरकार त्यातून मार्ग काढेल. लाडकी बहीण योजना बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. उलट ही योजना जास्त मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलं.

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार?

सध्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांमध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न पडला आहे. आता नोव्हेंबर महिना संपायला अवघे ७ दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र सरकारकडून यासंदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही.

बोअरवेल आणि टँकरच्या दरांवर सरकारचं लक्ष

दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतोय. काही ठिकाणी बोअरवेल खोदण्यासाठी आणि पाण्याच्या टँकरसाठी जास्त पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत.

यावर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. बोअरवेल खोदण्यासाठी ७० हजार रुपयांच्या कामाचं काही व्यावसायिक १ लाख २० हजार रुपये मागत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बोअरवेलचे दर ७० हजार रुपयांच्या पुढे जाऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. टँकरचालकांनीही नागरिकांकडून जास्त पैसे घेऊ नयेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेलकरांचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता? पाणीप्रश्नी भाजप आमदार विक्रांत पाटील आक्रमक

Maheshwari Saree Designs: महिलांसाठी खास महेश्वरी साड्यांचे कलेक्शन, 5 रंग उठून दिसतील

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळा सोनं १२४०० रुपयांची वाढले; १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Knee Swelling in Children: मुलांच्या गुडघ्याला सतत सूज येतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो हा गंभीर आजार!

'५० लाखांची कॅश देणारा तो नेता कोण?', शिवसैनिकाचा खळबळजनक व्हिडीओ पोस्ट, नेमकं काय केला आरोप

SCROLL FOR NEXT