Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या जिल्ह्यातील २ लाख लाडक्या बहिणी नाराज; eKYC केलं पण खात्यात ₹१५०० आलेच नाहीत

Ladki Bahin Yojana Yavatmal 2 Lakh Women Will Not Get Benefit: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे. परंतु लाखो महिलांना पैसे आलेच नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी

२ लाख लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळलाच नाही

महिलांच्या मनात अनेक प्रश्न

लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे.यानंतर डिसेंबरचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात होता. यानंतर आता लाखो महिलांना नोव्हेंबरचाच हप्ता मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अनेक महिलांना नोव्हेंबरचे १५०० रुपये आले नाही. त्यामुळे महिलांच्या मनात निराशा झाली आहे.

यवतमाळमधील २ लाख महिला लाभापासून वंचित (Yavatmal 2 Lakh Women Not Get Ladki Bahin Yojana November Installment)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १७वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र अनेक महिलांना दीड हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला नाही. या महिलांना जीव टांगणीला लागला आहे.

योजनेच्या लाभासाठी शासनाने ई-केवायसीची सक्ती केली.ही प्रक्रिया करताना चूक झाल्याने अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याची माहिती समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख महिलांना याचा फटका बसला आहे.लाभ न मिळाल्याने महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत. दीड हजार रुपये का मिळाले नाही, याची विचारणा करण्यासाठी लाडक्या बहिणी महिला व बालकल्याण विभागात चकरा मारत आहे.

यापुढेही या महिलांना मिळणार नाही लाभ (These Women will not get Ladki Bahin Yojana Benefit)

लाडकी बहीण योजनेत यापुढेही अनेक महिलांना लाभ मिळणार नाहीये. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्या महिलांना योजनेअंतर्गत १५०० रुपये मिळणार नाहीये. सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. अजूनही ४५ लाख महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सर्व महिलांचा लाभ बंद केला जाणाक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT